शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
3
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
4
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
5
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
6
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
7
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
8
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
13
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
14
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
15
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
16
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
17
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
20
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम

Kolhapur: दोन हजारचे आमिष दाखवून विविध बँकेतून कर्ज उचलले, अल्पशिक्षित महिलेने ४०० जणींना फसविले

By उद्धव गोडसे | Published: March 09, 2024 3:55 PM

कर्जाचे हप्ते थकले अन् हा प्रकार समोर आला

कोल्हापूर : दोन हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून सुनिता कृष्णात पाटील (वय ४५, रा. कुरुकली, ता. करवीर) या अल्पशिक्षित महिलेने गावातील सुमारे ४०० महिलांच्या नावे विविध बँकांमधून कर्ज उचलले. कर्जाचे हप्ते थकल्याने बँकांनी महिलांकडे तगादा लावल्याने हा प्रकार समोर आला. याबाबत महिलांनी शनिवारी (दि. ९) करवीर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. २०१९ मध्ये फसवणुकीचा प्रकार घडला.याबाबत अधिक माहिती अशी की, कुरुकली येथील सुनिता पाटील या महिलेने कोरोना काळात गावातील काही महिलांचे गट स्थापन केले. प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून त्यांचे आधार कार्ड, बँकेचे पासबूक, रेशन कार्डच्या झेरॉक्स आणि फोटो घेतले. या कागदपत्रांच्या आधारे जिल्हा बँकेसह अन्य खासगी बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून प्रत्येक महिलेच्या नावावर ३० ते ५० हजार रुपये कर्जाची उचल केली. सुरुवातीचे काही महिने हप्ते भरले. यामुळे कागदपत्र देणा-या महिलांची संख्या वाढली. मात्र, कर्जाचे हप्ते थकल्यामुळे गेल्या वर्षभरापासून बँकांची वसुली पथके दारात येऊ लागल्याने महिलांचे धाबे दणाणले. 

याबाबत महिलांनी स्मिता पाटील हिच्याकडे चौकशी करून कर्जाचे हप्ते भरण्याची विनंती केली. मात्र, तिने हात झटकल्यामुळे फसवणूक झालेल्या महिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. फसवणुकीची रक्कम एक कोटीपेक्षा जास्त असेल, असा अंदाज महिलांनी वर्तवला.

मास्टरमाईंड कोण?फसवणूक करणा-या संशयित महिलेचे शिक्षण फक्त सातवीपर्यंत झाले आहे. महिलांचे कागदपत्र गोळा करणे आणि बँकांमधून कर्ज घेण्याच्या कामात तिला कोणीतरी मदत केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या प्रकरणामागील मास्टरमाईंड कोण? याची चर्चा परिसरात रंगली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस