कोल्हापूर : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर १ हजार ४९१ प्रभागांतून ४ हजार २७ सदस्य गावगाडा हाकणार आहेत. बारा तालुक्यांपैकी करवीरमध्ये सर्वाधिक ५५८ सदस्य संख्या असून, सर्वात कमी सदस्य गगनबावड्यामध्ये आहेत.
जिल्ह्यात सध्या ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सध्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. बारा तालुक्यांतील या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांसह एकूण ४ हजार २७ सदस्य असणार आहेत.
--
तालुका : ग्रामपंचायतींची संख्या प्रभाग संख्या सदस्य संख्या
शाहूवाडी : ४१ : १२४ : ३२७
पन्हाळा : ४२ : १४३ : ३८२
हातकणंगले : २१ : ९४ : २५९
शिरोळ : ३३ : १५१ : ४२५
करवीर : ५४ : २०२ : ५५८
गगनबावडा : ८ : २४ : ६२
राधानगरी : १९ : ५९ : १५९
कागल : ५३ : १८६ : ५२७
भुदरगड : ४५ : १३६ : ३४१
आजरा : २६ : ७८ : २०६
गडहिंग्लज : ५० : १६६ : ४४२
चंदगड : ४१ : १२८ : ३३९
--------
जातपडताळणीसाठी दिवसाला ३०० च्यावर अर्ज
आरक्षित असलेल्या जागांवर निवडणूक लढविण्यासाठी नागरिकांना उमेदवारी अर्ज भरताना जातपड़ताळणीसाठी अर्ज केल्याची पावती, हमीपत्र देणे बंधनकारक आहे. त्यासाठी दिवसाला सरासरी २८० ते ३०० अर्ज येत आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शुक्रवार, शनिवार व रविवारीही जातपडताळणी कार्यालय सुरू होते, तर सोमवारी सर्वाधिक ३९० अर्ज आले आहेत. हे काम जलदगतीने व्हावे, यासाठी ६ टेबल मांडण्यात आले आहेत. उमेदवाराने भरलेल्या अर्जाची कॉपी व सोबतची कागदपत्रे येथे जमा केली की, जातीचा मूळ दाखला पाहून पावती दिली जात आहे.
----------