- संतोष मिठारीकोल्हापूर : राज्यातील १० विद्यापीठे आणि एका संस्थेतील विद्यार्थ्यांच्या विविध स्वरूपांतील ४०५ तक्रारी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी) प्रलंबित आहेत. त्यांच्या निवारणाची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. विद्यार्थ्यांना तक्रारी मांडण्यासाठी यूजीसीने आॅनलाइन उपलब्ध करून दिली आहे. त्यावरून यूजीसीकडे केलेल्या देशभरातील ५३२ विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांच्या ५८०३ तक्रारी आतापर्यंत प्रलंबित आहेत. त्यात महाराष्ट्रातील १० विद्यापीठे आणि एका शैक्षणिक संस्थेतील ४०५ तक्रारींचा समावेश आहे. त्यामध्ये परीक्षाविषयक मूल्यांकन आणि मानसिक छळ, आदी स्वरूपातील तक्रारींचा समावेश आहे. दरम्यान, यूजीसीने या तक्रार निवारण प्रक्रियेचे विकेंद्रीकरण करावे. त्याची जबाबदारी विद्यापीठांवर सोपावावी व यूजीसीने लक्ष ठेवावे, असे मत शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण आडसूळ यांनी व्यक्त केले.३१०९ तक्रारींचे निवारणदेशभरातील एकूण १५१ विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांतील ३१०९ तक्रारींचे निवारण झाले असून, त्यात महाराष्ट्रामधील ८७ तक्रारी आहेत. त्यामध्ये पुणे विद्यापीठ (७४), भारती विद्यापीठ (६), सोलापूर विद्यापीठ (४) आणि सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी (३) यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांच्या ४०५ तक्रारी यूजीसीकडे प्रलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 4:43 AM