शनिवारी शहरातील जवाहरनगर व धान्य ओळ परिसरात प्रत्येकी ४, नवीन कोल्हापूर नाका येथे ३, इंडस्ट्रीयल इस्टेट, फॉर्च्युन प्लाझा परिसर, लिंबू चौक भागात प्रत्येकी२, तर तुळजाभवानीनगर, नाकोडानगर, विक्रमनगर, षटकोन चौक, यशवंत कॉलनी, गोसावी गल्ली, जुना चंदूर रोड, वाल्मिकीनगर, अवधुतनगर शहापूर, मुरदुंडे मळा, मधुबन सोसायटी, राजराजेश्वरीनगर, मोठेतळे, सोलगे मळा, सर्वोदयनगर, आयोध्यानगर, कापड मार्केट, मदनलाल बोहरा मार्केट, आमराई रोड, खंजिरे मळा, सिध्दार्य सोसायटी, कारंडेमळा भोईनगर, पुजारी मळा, दत्तनगर, बाळनगर परिसरात प्रत्येकी १ असे ४२ रुग्ण मिळून आले आहेत. आजअखेर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या४७९८ झाली असून, सध्या ४२२ जणांवर उपचार सुरू आहेत; तर ४१६२ जण बरे होऊन घरी परतले आहेत; तर आजअखेर २१४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
इचलकरंजीत ४२ पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 4:24 AM