इचलकरंजी : शहरात विविध ३४ ठिकाणी ४३ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, मृत्यू झालेल्यांमध्ये शहापूर, दत्तनगर व जुना चंदूर रोड येथील तिघांचा समावेश आहे.
शिक्षक कॉलनी, सुतार मळा प्रत्येकी तीन, योगायोगनगर, लिगाडे मळा, दत्तनगर, गणेशनगर, पी. बा.पाटील मळा प्रत्येकी दोन, दाते मळा, शाहू हौसिंग सोसायटी, सावली सोसायटी, सिद्धकला कॉलनी, सोलगे मळा, अवधूत आखाडा, राधाकृष्ण चौक, बंगला रोड, जय भवानी, कापड मार्केट, सहकारनगर, यशवंत कॉलनी, आसरानगर, विकासनगर, शांतीनगर, केटकाळेनगर, तीन बत्ती चौक, चौंडेश्वरी कॉलनी, इंदिरा हौसिंग सोसायटी, वर्धमान चौक, लालनगर, भोईनगर, तोरणानगर येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत चार हजार ९४२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चार हजार २६० जण बरे झाले असून, ४६४ जण उपचार घेत आहेत. मृत्यूसंख्या २१७ वर पोहोचली आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एकावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रमेशकुमार पुखराज बालर (वय ३९, रा. धान्य ओळ) असे त्याचे नाव आहे. बालर हा कारमधून कर्नाटक-इचलकरंजी मार्गावर प्रवास करीत होता.