:
कोपार्डे: करवीर तालुक्यात कोरोना रुग्ण वाढीचा दर झपाट्याने वाढू लागला आहे. गेल्या चार दिवसात यात लक्षणीय वाढ झाली असून उपनगर व शहरालगतच्या गावाबरोबर ग्रामीण भागातील अनेक गावे कोणाची हॉटस्पॉट बनू लागले. तालुक्यातील ९० गावात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
करवीर तालुक्यात १३० गावे व वाड्या-वस्त्या आहेत. तालुक्यात आज अखेर ४३५ कोरोना रुग्ण आढळले असून दर दिवशी रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.
लोकांत वाढलेली बेफिकीर वृत्ती व ग्रामपंचायत पातळीवर लॉकडाऊनबाबत निष्क्रियता यामुळे ‘ब्रेक द चेन’ संकल्पनेला धाब्यावर बसवले जात असल्याचे चित्र आहे. करवीर तालुक्यातील १३० गावे व वाड्या-वस्त्यापैकी ९० गावात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
तालुक्यात बुधवारपासून कोरोना रुग्ण वाढीने गती घेतली आहे. बुधवारी ३२, गुरुवारी ४०, शुक्रवारी ५० तर शनिवारी ६२ असे एकूण १८४ रुग्ण सापडल्याने आहेत. ग्रामीण भागातही रुग्ण वाढू लागल्याने चिंता वाढली आहे.
चौकट
पार्सलच्या नावाखाली हॉटेल फुल्ल---
शहर व उपनगरात हॉटेल, बार, किराणा दुकान, टपरीवाले पार्सलच्या नावाखाली सुरू आहेत. पार्सल घेण्यासाठी पुन्हा जनता बिनधास्त रस्त्यावर येत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आवश्यक
ज्या गावात कोरोना रुग्ण आढळले आहेत त्या गावात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्याबरोबरच अलगीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी गावपातळीवर ग्रामसुरक्षा समिती सक्रिय होणे गरजेचे आहे.
सांगरूळ गावच्या ग्राम सुरक्षा समितीची आठवण
मागील वर्षी सांगरूळ ग्रामपंचायतीच्या वतीने चार ठिकाणी युवकांची कमिटी नेमून ती प्रभावी राबविण्यात आली होती.
शिंगणापूर कोविड केंद्र सुरू -- शिंगणापूर ता. करवीर येथे कोविड केंद्र सुरू करण्यात आले असून येथे ५७ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे पैकी २४ ऑक्सिजन बेड आहेत.
प्रतिक्रिया
करवीर तालुक्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता गंभीर परिस्थिती आहे. अशा वेळी शिंगणापूर केंद्र सुरू झाले असले तरी केईएम, डी. सी. नरके विद्यानिकेतन व कुरुकली महाविद्यालय या ठिकाणची केंद्रे सुरू होणे आवश्यक आहे.
राजेंद्र सूर्यवंशी, पंचायत समिती सदस्य