कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघासाठी (गोकुळ) शुक्रवारी ३९ जणांनी ४४ अर्ज दाखल केले. संघाचे विद्यमान संचालक दिनकर कांबळे, माजी संचालक फिरोजखान पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पुंडलिक पाटील, शंकरराव पाटील, शशिकांत पाटील, उदयसिंह पाटील-कावणेकर, अशोक खोत, आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केले. ‘गोकुळ’साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार (दि. २३)पर्यंत मुदत आहे. गुरुवारी ३८ अर्ज दाखल झाले होते. शुक्रवारी३९ जणांनी ४४ अर्ज दाखल केले. गेले तीन-चार दिवस उमेदवारी अर्ज खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अर्जांची विक्री व दाखल अर्जांची संख्या पाहता सोमवारी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होणार आहेत. गटनिहाय दाखल झालेले अर्ज असे : पांडुरंग यादव (प्रयाग-चिखली), शंकरराव पाटील (वरणगे), आप्पासो गावडे (शिरोळ), रघुनाथ पाटील (प्रयाग-चिखली), प्रवीण भोसले (चिखली), अविनाश पाटील (राशिवडे), गणपतराव फराकटे (बोरवडे), भीमगोंडा पाटील (गिजवणे), मारुती पाटील (शिनोळी), शिवशंकर हत्तरकी (हलकर्णी), शशिकांत पाटील (चुये), उदयसिंह पाटील (कावणे), अरुण इंगवले (आळते), रवींद्र पाटील (भुयेवाडी), एम. आर. पाटील (कुरुकली), सदानंद हत्तरकी (हलकर्णी), अशोक खोत (हणबरवाडी), रवींद्र घोरपडे (माद्याळ).भटक्या विमुक्त जाती : अशोक खोत (हणबरवाडी), नानासो हजारे (वाशी).अनुसूचित जाती : बाळकृष्ण भोपळे (खानापूर), दिनकर कांबळे (आदमापूर).इतर मागासवर्गीय : पुंडलिक पाटील (आमशी), शरद पाटील (मालवे), अविनाश पाटील (राशिवडे), नीळकंठ पाटील (तुर्केवाडी), फिरोजखान पाटील (तुरंबे), एम. आर. पाटील (कुरुकली), अशोक पाटील (आकनूर), अमर पाटील (तुरंबे).महिला : सुप्रिया भोसले (चिखली), विद्यादेवी पाटील (आकुर्डे), तेजस्विनी पाटील (राशिवडे), रूपाली सरनोबत (आसुर्ले), नर्मदा सावेकर (उत्तूर), शोभा फराकटे ( बोरवडे), शैलजा पाटील (गिजवणे), मैमुनबी पाटील (तुरंबे), गायत्रीदेवी सूर्यवंशी (पनोरी). सत्तारूढ-विरोधकांचे सोमवारी शक्तिप्रदर्शनाने अर्जसत्तारूढ गटातील काही विद्यमान संचालकांसह इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी सर्वच संचालक सोमवारी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल करणार आहेत. त्याचबरोबर विरोधी सतेज पाटील गटाचे अर्जही शक्तिप्रदर्शनाने दाखल करणार आहेत.अमावास्येवर झुंबड!शुक्रवारी अमावास्या असल्याने उमेदवारी अर्ज दाखल होण्याची संख्या कमी असेल, असा अंदाज होता; पण अनेकांनी हा मुहूर्त साधल्याने अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात इच्छुकांची झुंबड उडाली होती. तब्बल ४४ अर्ज दाखल झाले.
‘गोकुळ’साठी ४४ अर्ज
By admin | Published: March 20, 2015 11:35 PM