शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पाणी पुरवठा न करता ४४ हजारांचे बिल, महापालिकेचा बिल भरण्याचा तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 5:40 PM

प्रत्यक्षात २0१३ पासून पाणी पुरवठा होत नसताना चक्क ४४ हजार रुपयांचे बिल भरण्याचा तगादा महापालिकेने भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राकडे लावला आहे. नळ कनेक्शन बंद करण्याचा अर्जही थकबाकी भरल्याशिवाय बंद करता येत नसल्याचे कारण सांगून सुरू ठेवल्याने सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेची कोंडी झाली आहे.

ठळक मुद्देपाणी पुरवठा न करता ४४ हजारांचे बिलमहापालिकेचा भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राला झटका

कोल्हापूर : प्रत्यक्षात २0१३ पासून पाणी पुरवठा होत नसताना चक्क ४४ हजार रुपयांचे बिल भरण्याचा तगादा महापालिकेने भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्राकडे लावला आहे. नळ कनेक्शन बंद करण्याचा अर्जही थकबाकी भरल्याशिवाय बंद करता येत नसल्याचे कारण सांगून सुरू ठेवल्याने सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्थेची कोंडी झाली आहे.भालजी पेंढारकर यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना अध्यक्ष असलेल्या या संस्थेच्या वतीने विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. या ठिकाणी कला प्रबोधिनी संचलित इंटिरिअर डिझायनिंग महाविद्यालयही कार्यरत आहेत.संस्थेच्या वतीने चित्रकला, गायन, वादन, नृत्य आणि चित्रपट नाट्य अभिनयाचे वर्ग घेतले जातात; त्यामुळे रोज २00 ते २५0 विद्यार्थी आणि शिक्षकांची येथे वर्दळ असते. अशा केंद्रामध्ये स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे; मात्र २0१३/१४ पासून या केंद्राला पाणी पुरवठा बंद आहे.याबाबत वेळोवेळी ई वॉर्ड पाणी पुरवठा केंद्रात आणि जलअभियंता यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितल्यानंतरही अखेर संस्थेने महापालिकेच्या जनता दरबारात तक्रार केली. तेव्हा परवानाधारक प्लंबरकडून २00 फूट लांबीवरून कनेक्शन घेण्यास सांगण्यात आले.त्यासाठी संस्थेने १७ हजार रुपये खर्च केले; परंतु कनेक्शन बदलूनही अजूनही येथे पाणी येत नाही; त्यामुळे नाइलाजाने संस्थेला ५0 हजारांहून अधिक रक्कम खर्च करून रोज बाहेरून पाणी आणावे लागते. संस्थेच्या विद्यार्थ्यांची स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी यासाठी हा खर्च करावा लागला आहे.मात्र एकीकडे पाणी येत नसताना दुसरीकडे पाण्याची बिले मात्र नियमित येत आहेत. यासाठी कनेक्शन बंद करण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली; मात्र ४४ हजार रुपये थकबाकी भरल्याशिवाय कनेक्शन बंद करता येत नसल्याचे महापालिकेने कळविले आहे.

पाणी सुरू करा, दुरूस्त बील भरूएकीकडे पाणी येत नसताना थकबाकी विलंब आकार, सांडपाणी व्यवस्थापन अधिभार आकारणे चुकीचे आहे. हे बिल दुरूस्त करून पाणी सुरू केल्यास संस्था बिल भरेल. मात्र पाणी न देताच चुकीचे बिल कसे भरायचे, असा संस्थेचा सवाल आहे.खुले असणारे पाणी मीटर कुलूपबंद कसेसंस्थेचे पाणी मीटर बाहेरच्या बाजूस आणि कायमस्वरूपी खुले असताना मीटर रीडरकडून मात्र कुलूप बंद असे चुकीचे शेरे नोंदविण्यात आल्याचेही संस्थेच्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर