शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

४५ लाखांचे कापड पळविले

By admin | Published: April 25, 2015 12:36 AM

ट्रकही गायब : इचलकरंजीतील कापड उत्पादकांमध्ये घबराट

इचलकरंजी : ४५ लाख रुपयांच्या कापडाच्या गाठींसह ट्रक पळवून नेल्यामुळे शहरातील वाहतूकदार संस्था व ट्रक मालकांमध्ये खळबळ उडाली आहे. राजस्थानमधील पिंडवाडा येथे ही घटना घडली असून, त्यामुळे अडत व्यापारी व कापड उत्पादकही धास्तावले आहेत. येथील राजेंद्र मगदूम (रा. मधुबन सोसायटी) यांचा ट्रक (एमएच ०९ सीयू ३८३९) हा सोमवारी शशी ट्रान्स्पोर्टमधून ४५ लाख रुपये किमतीच्या २१३ गाठी कापड घेऊन राजस्थानला निघाला. तो दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास गुजरात सीमा ओलांडून राजस्थानमध्ये पिंडवाडा येथे घाटात जात असताना बोलेरो जीप गाडीतून आलेल्या पाच-सहाजणांनी ट्रक अडविला. ते जबरदस्तीने ट्रकमध्ये घुसले. त्यांनी चाकू व बंदुकीचा धाक दाखविला आणि ट्रकचालक शीतल कदम व क्लिनर विकास शिंदे या दोघांना त्या ठिकाणापासून सुमारे ३०० कि.मी. अंतरावर रनसे (सोजेत) येथे एका शेतात सोडले. चोरटे ट्रक घेऊन पळून गेले. मात्र, त्यांना कदम व शिंदे यांच्या अंगावरील बनियन व चड्डी व्यतिरिक्त सर्व कपडे काढून घेतले होते. या दोघांना पहाटे ३.३० वाजता सोडल्याची माहिती ट्रकचे मालक राजेंद्र मगदूम यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली. या घटनेची नोंद पिंडवाडा (राजस्थान) पोलीस ठाण्यात झाली आहे. इचलकरंजीतून निघालेले ट्रक तिसऱ्या दिवशी राजस्थानला पोहोचतात. उन्हाळ्याच्या दिवसात रात्री प्रवास करावा लागतो. मात्र, ट्रकमधील कापडाचा विमा उतरविण्यास अडत व्यापारी टाळाटाळ करीत असतात. परिणामी, लाखो रुपयांच्या कापडाची जोखीम वाहतूकदार संस्था घेत नाहीत. कारण वाहतूकदार फक्त वाहतूक भाडे घेतात. यामुळे संबंधित अडत व्यापारी व कापड उत्पादक अडचणीत येतात. मागील महिन्यातही पिंपवाडा येथील घाटातच इचलकरंजीतील आणखीन एक ट्रक चोरण्याचा प्रयत्न झाला होता. तेव्हा ट्रकचालकाने दाद दिली नाही. त्यामुळे त्याला चोरट्यांनी मारहाण केली व त्यात चालक गंभीर जखमी झाला होता. अशा घटनांमुळे येथील वस्त्रोद्योगात अस्वस्थता पसरली आहे. (प्रतिनिधी)