जयसिंगपूर : शिक्षिकेकडून ४५ हजार रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी जयसिंगपूर शहराजवळील संजीवनी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आण्णासाहेब विभूते धरणगुत्ती विद्यामंदिर प्राथमिक शाळेच्या अध्यक्षासह मुख्याध्यापक व शिपाई यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. संस्थेचे अध्यक्ष अजित उध्दव सुर्यवंशी (रा.धनराज वसाहत अपार्टमेंट, राजवाडा, सांगली, मुळगांव पारा, ता.विटा), मुख्याध्यापक महावीर आप्पासाहेब पाटील (वय ५७, रा.धरणगुत्ती, ता.शिरोळ) व शिपाई अनिल बाळासोा टकले (वय ५१, रा.नदीवेस राममंदिरजवळ, इचलकरंजी) अशी संशयीतांची नावे असून यातील मुख्याध्यापक व शिपायाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई आज, बुधवारी करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे, पोलिस उपनिरीक्षक संजीव बंबरगेकर, पोलिस कर्मचारी प्रकाश भंडारे, विकास माने यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
Kolhapur: शिक्षिकेकडून घेतली ४५ हजार रुपयाची लाच; संस्थाचालकासह मुख्याध्यापक, शिपाई लाचलुचपतच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 7:32 PM