१) गेल्या चार वर्षांत वारंवार नियम बदलल्याने करप्रणाली अधिक किचकट झाली आहे.
२) विलंब शुल्क अनावश्यक लावला जात आहे.
३) परताव्यात चूक झाल्यास दुरुस्त करता येत नाही.
४) जीएसटी पोर्टल व्यवस्थित चालत नाही.
५) ई-वे बिलासाठी प्रवासाची अट, अनवधानाने विवरणपत्रात चूक झाल्यास दंडात्मक कार्यवाही अन्यायकारक आहे.
कोण, काय, म्हणाले...
ललित गांधी : या बंदच्या माध्यमातून व्यापारी, व्यावसायिकांनी दाखविलेल्या एकजुटीच्या ताकदीची केंद्र सरकारला दखल घ्यावी लागेल. आम्हाला अपेक्षित बदल, सुधारणा लवकरच होतील, अशी आशा आहे.
धैर्यशील पाटील : जीएसटीमधील जाचक अटींमुळे इन्स्पेक्टरराजचा पुनर्जन्म झाला आहे. या अटींमध्ये सुधारणा कराव्यात. देशातील ४० हजार संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या.
संजय शेटे : या बंदची दखल घेऊन केंद्र सरकारने लवकर जाचक अटी, तरतुदींमध्ये सुधारणा करावी. अन्यथा एप्रिलपासून बेमुदत बंद करण्यात येईल.
आनंद माने : केंद्र सरकारच्या फसव्या योजना, घोषणांबाबतच्या उद्रेकाची एक झलक व्यापारी, व्यावसायिकांनी दाखवली आहे. सरकारने जाचक अटींमध्ये वेळीच सुधारणा करावी.
फोटो (२६०२२०२१-कोल-व्यापार बंद ०१, ०२, ०३) : कोल्हापुरात शुक्रवारी जीएसटी आणि फूड सेफ्टी ॲक्टमधील अडचणीच्या तरतुदींविरोधात व्यापारी, व्यावसायिकांनी बंद पाळला. त्यामुळे महाद्वार रोडवरील दुकाने बंद राहिल्याने या परिसरात शुकशुकाट पसरला होता. (छाया : आदित्य वेल्हाळ)
फोटो (२६०२२०२१-कोल-व्यापार बंद ०४, ०५, ०६, ०७ व ०८) : कोल्हापुरात शुक्रवारी जीएसटी आणि फूड सेफ्टी ॲक्टमधील अडचणींच्या तरतुदींविरोधात व्यापारी, व्यावसायिकांनी बंद पाळला. त्यामुळे लक्ष्मीपुरी धान्य बाजारातील दुकाने बंद राहिल्याने या परिसरात शुकशुकाट पसरला होता. (छाया : आदित्य वेल्हाळ)
फोटो (२६०२२०२१-कोल-व्यापार बंद ०९) :
कोल्हापुरात शुक्रवारी जीएसटी आणि फूड सेफ्टी ॲक्टमधील अडचणींच्या तरतुदींविरोधात व्यापारी, व्यावसायिकांनी बंद पाळला. त्यांच्यावतीने कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संजय शेटे, ‘कॅट’चे अध्यक्ष धैर्यशील पाटील आणि राष्ट्रीय संघटन सचिव ललित गांधी यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले. यावेळी डावीकडून शिवाजीराव पोवार, आनंद माने, हरिभाई पटेल, प्रशांत शिंदे, संपत पाटील, धनंजय दुग्गे, संभाजीराव पोवार, विजय नारायणपुरे, तौफिक मुल्लाणी उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)