राजाराम लोंढे
कोल्हापूर : जेईई’, ‘नीट’सह, अन्य प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी कोटा (राजस्थान) येथे गेलेले महाराष्टÑातील सुमारे ४५०० विद्यार्थी सध्या तिथेच अडकून पडले आहेत. तिथे ह्यकोरोनाह्णचा संसर्ग वाढू लागल्याने केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांना घरी पाठविण्याचे आदेश दिल्याने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, गुजरात राज्य सरकारांनी आपापल्या राज्यांतील विद्यार्थ्यांना तेथून नेले आहे. मात्र महाराष्टÑ सरकारने अद्याप आदेश न दिल्याने या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
बारावीनंतर इंजिनिअरिंग, मेडिकल, आदींकडे जाण्यासाठी पूर्वतयारी परीक्षा द्यावी लागते. पूर्वतयारी परीक्षेच्या अभ्यासाची देशात अनेक केंद्रे आहेत. त्यांपैकी देशातील आजच्या घडीला सर्वांत नावाजलेले केंद्र हे राजस्थानमधील ह्यकोटाह्ण हे आहे. येथे मोठे खासगी क्लासेस आहेत. देशभरातील लाखो विद्यार्थी तेथे अभ्यासासाठी येतात. विद्यार्थी आपल्या मूळ गावी अकरावी व बारावीचे प्रवेश घेतात आणि पूर्वतयारीच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी ह्यकोटाह्ण येथील विविध क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. विद्यार्थी दोन वर्षे तिथे राहून अभ्यास करतात. गेले महिनाभर ह्यकोरोनाह्णचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे मुलांसह पालक हवालदिल झाले आहेत. या मुलांना आपापल्या गावी पाठवावे, असे आदेश केंद्र सरकारने काढल्यानंतर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल यांनी आपापली मुले नेली आहेत. उत्तर प्रदेश सरकारने तर स्वतंत्र रेल्वे पाठवून या मुलांना नेले. गुजरात सरकारने आता त्यांना नेण्यास सुरुवात केली आहे. महाराष्टÑातील सुमारे ४५०० विद्यार्थी येथे अडकलेले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांच्या जेवणाखाण्याची आबाळ होत आहेच; मात्र या परिसरात ह्यकोरोनाह्ण पाय पसरू लागल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील ३० विद्यार्थीकोल्हापुरातूनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तिथे गेले आहेत. शिरोळ, इचलकरंजी, राजारामपुरी, कोल्हापूर शहर, हरपवडे, खुपिरे, गोठे येथील विद्यार्थ्यांसह काहीजणांचे पालकही अडकले आहेत.पी. एन. पाटील यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चाया विद्यार्थ्यांना गावी पाठविण्याबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार पी. एन. पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
‘कोटा’ परिसरात ‘कोरोना’चा संसर्ग वाढू लागल्याने इतर राज्यांनी आपापले विद्यार्थी नेले आहेत. महाराष्ट सरकारनेही तातडीने राज्यातील मुले हलविण्याबाबत निर्णय घ्यावा.- शिवाजी पाटील (पालक, खुपिरे)-