शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

‘मेडिकल’ला प्रवेश देतो असे सांगून ४६ लाखांची फसवणूक

By admin | Published: September 20, 2015 9:49 PM

कुंडल येथील युवकास कोल्हापुरात अटक

कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, नवी मुंबई येथे अ‍ॅडमिशन मिळवून देतो, असे सांगून ४६ लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या युवकास रविवारी जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपी स्नेहल संभाजी पवार (वय ३५, रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. संशयित स्नेहल पवार याने शिवकुमार जगतनारायणजी खन्ना (रा. हिरणमगरी सेक्टर, उदयपूर-राजस्थान) यांच्याकडून त्यांची मुलगी प्रियल हिला डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, नवी मुंबई येथे अ‍ॅडमिशन मिळवून देतो, असे सांगून ४६ लाख रुपये घेऊन तो गायब झाला होता. या प्रकरणी शिवकुमार यांनी सूरजपोल पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली होती. पवार हा सांगली जिल्ह्यात राहणारा असल्याने सूरजपोल पोलिसांनी त्याच्या कुंडल येथील घरी छापा टाकला असता तो कोल्हापूर येथील बिनखांबी गणेश मंदिर परिसरात राहत असल्याचे समजले. त्यानुसार सूरजपोल पोलिसांनी रविवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांची भेट घेऊन तपासासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. त्यानुसार देशमुख यांनी गुन्हे शाखेच्या टीमला त्यांच्यासोबत पाठवून आरोपी पवार याला बिनखांबी गणेश मंदिराजवळील चायनिस हॉटेलजवळ ताब्यात घेतले. पवार याने अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे सूरजपोल पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)