शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

कोल्हापूर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ४८ कोटींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:19 AM

कोल्हापूर : जलयुक्त शिवार योजनेचा राज्यभर बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत असले तरी कोल्हापुरात थोडी बरी परिस्थिती आहे. मुळातच मध्यम, ...

कोल्हापूर : जलयुक्त शिवार योजनेचा राज्यभर बोजवारा उडाल्याचे चित्र दिसत असले तरी कोल्हापुरात थोडी बरी परिस्थिती आहे. मुळातच मध्यम, मोठ्या धरणांमुळे पाणीदार असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला. गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात १०७ गावांतून ४८ कोटी ७८ लाखांची १८५९ कामे पूर्णत्वास गेली आहेत. यात शासकीय व लोकसहभागातून गाळ काढणे, शेततळे, समतल चर, आदी कामे प्राधान्याने झाल्याने सुमारे १५ हजार टी. सी. एम. (थाऊजंड क्युबिक मीटर) पाणीसाठा नव्याने झाला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात काळम्मावाडी, राधानगरी, वारणा, तुळशी या मोठ्या प्रकल्पांसह आणखी १४ मध्यम प्रकल्पांतून पाण्याची साठवणूक होते. मुळातच जिल्हा जलयुक्त असल्याने येथे जलयुक्त शिवार योजनेची फारशी गरज नव्हती; पण जिल्ह्यातील विचित्र भौगोलिक परिस्थितीमुळे अतिपाऊस पडणाºया क्षेत्रांमध्ये जमिनी पाणथळ बनतात तर अतिशय कमी पाऊस असलेल्या ठिकाणी पिके पाण्यासाठी ओढ धरतात. मुळातच कोल्हापूर जिल्ह्यात तलावांची संख्या मोठी आहे. परंपरागत पाणी साठविण्याची आणि ते शेतीसह अन्य कामाला वापरण्याची सोय आहे; पण काळानुरूप त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हे तलाव गाळाने भरून गेल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाल्याने पावसाळ्यात ओसंडून वाहणारे तलाव उन्हाळ्याच्या तोंडावर कोरडे पडतात.या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी विभागाने राज्य शासनाच्या वतीने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्याचा सहभाग नोंदविला. २०१५ ते २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत १०७ गावांनी यात सहभाग घेतला. या गावांतील सर्वेक्षणानुसार ११८८ कामांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली. त्यासाठी ६० कोटी ८३ लाखांची रक्कमही मंजूर करण्यात आली. या मंजूर कामांपैकी १८५९ कामे आजअखेर पूर्णत्वास गेली आहेत. यावर ४८ कोटी ७८ लाखांचा खर्चही करण्यात आला आहे. या कामामुळे जिथे पाऊस कमी पडतो अशा जिल्ह्यातील तालुक्यात नव्याने पाणीसाठा होण्यास मदत झाली आहे.वर्ष गावे मंजूर पूर्ण खर्च पाणीसाठा कामे कामे (लाखांत) (टी.सी.एम.)२०१५-१६ ६९ १२१२ १२१२ ३०३८.१० ७१५.४७२०१६-१७ २० ४६१ ४६१ १७.०७.९२ ९१६९.९८२०१७-२०१८ १८ २१५ १८६ १३२.२८ ४२८६.८२सन २०१८-१९ साठी या योजनेकरिता ७२ गावांची निवड झाली असून तेथे १० कोटी ५६ लाख खर्चाची ६१२ कामे मंजूर करण्यात आली आहेत. पावसाळा सुरू असल्याने ही कामे सुरू होऊ शकली नव्हती. यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू आहेत. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नव्या कामांना सुरुवात होणार आहे.