एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत बुधवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. बुधवारी २६, तर गुरुवारी तब्बल ४८१ व्यक्तींनी ४९१ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मार्गशीर्ष गुरुवार व्रताचा दिवस साधून अनेक इच्छुक निवडणुकीच्या रिंगणात उतरले.
---
आलेले अर्ज तालुकानिहाय
तालुका : व्यक्ती अर्ज
शाहूवाडी : ९ : ९
पन्हाळा : ५३ : ५३
हातकणंगले : ५२ : ५२
शिरोळ : ७३ : ७३
करवीर : ९३ : ९९
गगनबावडा : ० : ०
राधानगरी : ५३ : ५३
कागल : ६८ : ६८
भुदरगड : २१ : २२
आजरा : १६ : १६
गड़हिंग्लज : २७ : २९
चंदगड : १६ : १७
--------------
जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय सुरू राहणार
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये राखीव जागेवरील इच्छुक उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून आज शुक्रवार, शनिवार व रविवार या शासकीय सुट्टीच्या दिवशी केवळ ग्रामपंचायत निवडणूक विषयक अर्ज स्वीकरण्यासाठी कार्यालय चालू राहील, असे जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणीचे सदस्य सचिव सचिन साळे यांनी जाहीर केले आहे. उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्र अथवा प्रस्ताव सादर केल्याची पोहोच पावती जोडणे बंधनकारक आहे.
--
शैक्षणिक पात्रता
सरपंचाची निवड आता निवडून आलेल्या सदस्यांमधून करण्यात येणार असल्याने या निवडणुकीसाठीच्या इच्छुक उमेदवाराचे वय २१ वर्षांपेक्षा कमी असू नये, त्यांचे नाव मतदार यादीत असले पाहिजे, तसेच त्यांनी किमान सातवी उत्तीर्ण असले पाहिजे. वरील सर्व प्रकारची पात्रता असल्याशिवाय सदस्याची सरपंच पदावर नियुक्ती होणार नाही, असे गुरुवारी राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
---