आजरा : आजरा साखर कारखाना निवडणुकीसाठी गुरुवारी माघारीच्या शेवटच्या दिवसी २१ जागांकरिता ४९ अर्ज शिल्लक राहिले असून स्व. वसंतराव देसाई शेतकरी विकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रसची श्री रवळनाथ स्व. वसंतराव देसाई विकास आघाडी अशी दुरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. चार दिवस चर्चेत असणारी तिसरी आघाडी चर्चेपुरतीच राहिल्याचे स्पष्ट झाले.माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवसी तब्बल १४६ जणांनी माघारी घेतली, तर इतर आजअखेर १८६ इच्छुकांनी माघारी घेतली. उत्तूर-मडिलगे गटातून एकास एक लढत होत आहे. स्व. देसाई आघाडीतून विश्वनाथ करंबळी, मारुती घोरपडे विरुद्ध श्री रवळनाथ स्व. वसंतराव देसाई विकास आघाडीचे उमेश आपटे, वसंतराव धुरे आणि काशिनाथ तेली यांच्यात थेट लढत होत आहे. आजरा-श्रृंगारवाडी गटातही हीच परिस्थिती आहे. महाआघाडीतून अशोक चराटी, दिगंबर देसाई, राजू होलम व रवळनाथ आघाडीचे जयवंतराव शिंपी, मुकुंदराव देसाई व अल्बर्ट डिसोझा एकमेकांसमोर आहे.भादवण-गजरगाव गटात आनंदराव कुलकर्णी, संजय पाटील व उद्योजक मारुती ऊर्फ बापूसाहेब सरदेसाई विरुद्ध राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रसच्या रवळनाथ विकास आघाडीतून श्रीमती अंजनाताई रेडेकर, एम. के. देसाई, शिवा जाधव, असे तीन जागांसाठी उमेदवार आहेत.बंडखोरीची भाषा करणारे सर्वच इच्छुक उमेदवार निवडणुकीतून बाहेर पडल्याने हत्तीवडे-मलिग्रे गटात जोरदार लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. महाआघाडीचे विष्णुपंत केसरकर, भीमा दळवी आणि सीताराम पाटील व विरोधी रवळनाथ आघाडीतून अनिल फडके, आनंदा बुगडे व अॅड. लक्ष्मण गुडूळकर यांच्यात लढत आहे. पेरणोली-गवसे गटातून तीन जागांसाठी नऊ उमेदवार रिंगणात आहेत. महाआघाडीतून दशरथ अमृते, राजेंद्र सावंत, इंद्रजित देसाई, रवळनाथ आघाडीतून सुधीर देसाई, उदय पोवार व सदाशिव डेळेकर तर तातोबा पाटील, शांताराम पाटील, शामराव बोलके अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. ‘ब’ वर्गातून महाआघाडीचे प्रकाश कोंडुसकर व प्रा. सुनील शिंत्रे या दोन विद्यमान संचालकांत लढत आहे. इतर मागास प्रवर्गातून रवळनाथ विकास आघाडीतून आप्पा खेडेकर, महाआघाडीतून जनार्दन टोपले व अपक्ष म्हणून शिवाजी गुरव रिंगणात आहेत. महिला राखीव गटातून महाआघाडीतून सुनीता रेडेकर, नर्मदा सावेकर विरुद्ध विजयालक्ष्मी सुभाष देसाई, छाया ज्ञानदेव पोवार, अशी लढत होत आहे. भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून विद्यमान संचालक बयाजी मिसाळ अपक्ष, महाआघाडीतून आनंदराव कांबळे व श्री रवळनाथ आघाडीतून आण्णासाहेब पाथरवट आहेत, तर विटे येथील महादेव पाटील अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. अनु. जाती जमाती प्रवर्गातून रवळनाथ आघाडीतून एस. पी. कांबळे, तर महाआघाडीतून मलिक बुरूड तर अपक्ष म्हणून हरी कांबळे आहेत. (प्रतिनिधी)
आजरा कारखान्यासाठी ४९ जण रिंगणात
By admin | Published: May 13, 2016 12:44 AM