जयसिंगपूर : शासनाच्या विविध योजनेमधून शिरोळ तालुक्यातील विविध गावामधील विकास कामांसाठी ५ कोटी १८ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे तालुक्याच्या विकासात आणखी भर पडणार आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
जनसुविधा योजनेमधून १ कोटी ५० लाख, नागरी सुविधा योजनेंतर्गत १ कोटी, क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेमधून १ कोटी, अनुसूचित जाती व नवबौद्ध विकास योजनेंतर्गत १ कोटी, तसेच शिरोळ तालुक्यातील अंगणवाडी इमारत व उर्दू शाळा इमारत बांधकामासाठी ६८ लाखांचा निधी असा एकूण ५ कोटी १८ लाखांचा निधी मिळाला आहे. विविध योजनेमधील या निधीचा विनियोग सर्व गावातील घटकांना मिळणार आहे. या विकास कामांमुळे तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लागणार असल्याचेही मंत्री यड्रावकर यांनी यांनी सांगितले.