शहरं
Join us  
Trending Stories
1
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
2
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
3
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
4
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
5
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
6
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
8
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
9
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
10
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
11
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
12
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
13
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
14
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
15
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
16
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
17
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
18
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
19
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल

कोल्हापूर जिल्'ात प्रचंड ईर्ष्येने ७४ टक्के मतदान -:करवीरमध्ये राज्यात सर्वाधिक ८२.१५ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 10:23 PM

जिल्ह्यात मतदानाची वेळ झाल्यानंतरही किमान सहा मतदान केंद्रात मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे ते मतदान विचारात घेवून सुमारे ७४ टक्के मतदान होईल, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रात्री पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्देपावसाने उसंत दिल्याने मतदारांत उत्साह : : राजकीय भवितव्याचा फैसला गुरुवारी

कोल्हापूर जिल्'ातील दहा मतदारसंघांत अत्यंत ईर्ष्येने ग्रामपंचायत निवडणुकीला होते तसे मतदान सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी झाले. जिल्ह्यात मतदानाची वेळ झाल्यानंतरही किमान सहा मतदान केंद्रात मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे ते मतदान विचारात घेवून सुमारे ७४ टक्के मतदान होईल, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रात्री पत्रकार परिषदेत सांगितले. राज्यात सर्वाधिक ८२.१५ टक्के मतदान करवीर मतदारसंघात झाले. दिवसभर पावसाने चांगली उसंत घेतल्याने मतदार व उमेदवारांचाही उत्साह वाढला. जिल्'ात किरकोळ शाब्दिक बाचाबाची वगळता कुठेही अनुचित प्रकार अथवा दुबार मतदानाच्या तक्रारी झाल्या नाहीत.

जिथे सुशिक्षित मतदारांची संख्या जास्त असे शहरी मतदार असलेल्या कोल्हापूर उत्तर आणि इचलकरंजी मतदारसंघात मतदानाची टक्केवारी कमी आहे. कोल्हापूरातील लक्षतीर्थ वसाहत, जयसिंगपूरमधील तीन केंद्रे व जैन्याळ (ता.कागल) येथे रात्री उशीरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरु राहिली. मतमोजणी गुरुवारी (दि.२४) होणार असून दुपारी चारवाजेपर्यंत निकाल जाहीर होतील.

जिल्'ात दहा मतदारसंघांत १०६ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, भाजपचे उपाध्यक्ष धनंजय महाडिक व शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक या सर्वांचीच राजकीय प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. गेली आठवडाभर रोजच दुपारनंतर पाऊस येत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळच्या टप्प्यातच मतदान करावे, असे आवाहन केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला व सकाळी सातपासूनच मतदान प्रक्रियेने वेग घेतला. सकाळच्या टप्प्यात गावोगावी वैरण, शेतीची कामे करण्यात लोक गुंतल्याचे चित्र दिसत होते. अनेकांनी अगोदर मतदान केले व मगच दैनंदिन कामासाठी लोक बाहेर पडले. मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्सव समजून काही गावांत मतदान केंद्रासमोर रांगोळी रेखाटण्यात आली. मतदान केंद्रेही फु ग्यांनी सजविण्यात आली. मतदारांना बसण्यासाठी सोय करण्यात आली. पाऊस सुरू झाला तर वृद्ध, आजारी, दिव्यांग मतदारांना बाहेर काढणे शक्य होणार नाही म्हणून अगोदर त्यांना प्राधान्याने मतदानास आणण्यात आले. मतदारांना आणण्यासाठी सर्रास वाहनांचा वापर झाला.

काही ठिकाणी मतदान केल्यानंतर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागत होता. त्यामुळेही लांबच्या लांब रांगा लागल्या. तरुणांईसह महिला, वृद्ध, ज्येष्ठ नागरिकांनीही मतदानाचा हक्क बजावल्यानेच मतदानाचा टक्का वाढल्याचे चित्र आहे. निवडणुकीत चुरस जरुर होती; परंतु कुठेही तणाव नव्हता. त्यामुळे लोकांनी निर्भयपणे मतदान केले.

  • राज्याच्या तुलनेत मतदान चांगले का झाले??
  • उमेदवारांनी एकेक मतासाठी लावलेली ताकद
  • पावसाने दिवसभर चांगली उसंत दिल्याने उत्साह
  • तणाव अथवा अनुचित प्रकार नसल्याने निर्भयपणे मतदान
  • घरोघरी व्होटर स्लीप व सुलभ मतदान प्रक्रिया
  • मतदारांना आणण्यासाठी वाहनांचा वापर

अंदाजित टक्केवारी२०१९ व २०१४चंदगड : ६८.०४ : ७१.७८राधानगरी : ७५.०५ ७६.८९कागल : ८१.५८ ८२.३४कोल्हापूर दक्षिण : ७४.०० ७०.१९करवीर : ८२.१५ ८४.३६कोल्हापूर उत्तर : ५९.०१ ६१.६८शाहूवाडी : ८०.०० ७७.७६हातकणंगले : ७१.४१ ७३.९३इचलकरंजी : ६७.०२ ७४.७७शिरोळ : ७२.०० ७८.४०दक्षिण, शाहूवाडीत वाढलेला टक्का कुणाचे बारा वाजणार..?जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री मतदानाची अंदाजित टक्केवारी सांगितली. ती आज मंगळवारी सर्व केंद्राकडून अहवाल आल्यानंतर अंतिम करण्यात येईल त्यामुळे ती कमी जास्त होवू शकते. परंतू जी जाहीर करण्यात आली आहे, तिचा आधार घेता जिल्ह्यांतील दहापैकी करवीर,कागल,शिरोळ,राधानगरी,इचलकरंजी,हातकणंगले,चंदगड आणि कोल्हापूर उत्तर या मतदार संघात यंदाच्या राज्याच्या टक्केवारीच्या तुलनेत जास्त असला तरी जिल्ह्याच्या गतनिवडणूकीपेक्षा मतदानाचा टक्का घटला आहे. याउलट कोल्हापूर दक्षिणमध्ये सर्वाधिक ३.८१ टक्के मतदान वाढले आहे. त्या मतदार संघातील एकूण मतांचा विचार करता वाढलेले मतदान १२३६३ इतके आहे. या मतदार संघात काँग्रेसचे ऋतुराज पाटील विरु ध्द भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत होत आहे. त्यामध्ये हे वाढलेले मतदान कुणाचे बारा वाजवतात याबध्दल उत्सुकता आहे. अशीच चुरस या निवडणूकीत शाहूवाडी मतदार संघातही आहे. तिथेही गतनिवडणूकीपेक्षा २.२४ टक्के मतदान जास्त झाले आहे. म्हणजे एकूण मतांचा विचार करता हे मतदान ६४४२ आहे. गेल्या निवडणूकीत शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील यांच्याकडून जनसुराज्यशक्तीचे विनय कोरे हे फक्त ३८८ मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळे तिथेही वाढीव मतदान कुणाच्या पथ्यावर पडणार ही उत्सुकता आहे.----------------------------------स्थानिक लोकांमुळेच जैन्याळला उशीरापर्यंत मतदानजैन्याळमध्ये लोक मतदानासाठी उशीराने आल्यामुळे मतदान प्रक्रिया रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सुरु राहण्याची शक्यता असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. तिथे ११०० मतदान आहे. त्यासाठी एकच केंद्र आहे. कारण दीड हजारांहून जास्त मतदान असले तरच दुसरे केंद्र देता येते. परंतू तिथे गेल्या निवडणूकीतही रात्री ११ वाजेपर्यंत मतदान सुरु होते. एवढा उशीर का होतो याची स्थानिक कारणे कांही असू शकतात ती माध्यमांनीच शोधून काढावीत असे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर उपस्थित होते. 

कोल्हापूरात कायमच उत्साहाने मतदान होते ती परंपरा यानिवडणूकीतही कायम राहिली. त्यासाठी मी जिल्ह्यांतील जनतेचे, राजकीय कार्यकर्त्यांचे व नेत्यांचे आणि ही निवडणूक प्रक्रिया उत्तमरितीने पार पाडल्याबधद्दल प्रशासकीय यंत्रणेचेही मनापासून अभिनंदन करतो व आभार व्यक्त करतो.दौलत देसाईजिल्हाधिकारी कोल्हापूर

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीVidhan Parishadविधान परिषद