कोल्हापूर : आॅलिम्पिक टारगेट शूटिंग रेंजच्या २१ खेळाडूंची ६३ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.यावर्षी इंदौर येथे घेण्यात आलेल्या ७0 व्या बेस्ट झोन नेमबाजी स्पर्धेत तसेच गुजरातमधील अहमदाबाद येथील २९ व्या आॅल इंडिया जी. व्ही. मावळणकर नेमबाजी स्पर्धेत आणि दिल्ली येथे झालेल्या आॅल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी नेमबाजी स्पर्धांमध्ये रेंजच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी ऐश्वर्या नारायण पाटील, शिवराज शशिकांत शिंदे, सत्यम सदाशिव कदम, सर्वेश पाटील, साक्षी शिवाजी जाधव, शब्दश्री किरण कांबळे, दिव्या राजेश धुमाळ, गौतम बाबासाहेब तपासे (१0 मीटर एअर रायफल), गौरी गणेश साळोखे, तेजस प्रकाश ढेरे, शिवाजी श्रावण पाटील, सुयश उमाजी पाटील, किरण बाजीराव कांबळे, रूपेश आनंदा कोळी, गजानन मच्छिंद्र गडवेकर, विश्वजित संतोष निंबाळकर, साईश महेश संकपाळ, अनुराग संजय चौगले, सौरियन श्रेयांश डुणूंग (१0 मीटर एअर पिस्तल) प्रशिक्षक विनय विश्वासराव पाटील यांच्यासह २१ खेळाडूंची निवड झाली आहे.रेंजचे संचालक सचिन पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत साखरे, तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण आणि कोल्हापूर जिल्हा मेन अँड वुमेन रायफल असोसिएशनचे प्रोत्साहन या खेळाडूंना लाभले आहे. प्रशिक्षक विनय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे खेळाडू टिंबर मार्केट येथील आॅलिम्पिक शूटिंग रेंजवर नेमबाजीचा सराव करत आहेत.