शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

पुरवणी यादीत ५ हजार मतदार वाढले; आणखी १४०० मशीन लागणार, जिल्हा प्रशासनाचा कस 

By इंदुमती सूर्यवंशी | Published: April 22, 2024 9:14 PM

जिल्ह्यात ३ हजार ३६८ मतदान केंद्रे असून, सध्या प्रशासनाने एक बॅलेट युनिट लागेल या दृष्टीने तयारी केली होती. २ हजार मशीन वाढीव ठेवण्यात आले होते. आता दोन्ही मतदारसंघांत दाेन दोन बॅलेट युनिट ठेवावे लागणार आहे, त्यासाठी आणखी १४०० मशीन लागणार आहे.

कोल्हापूर : जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात यंदा प्रथमच कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघातून सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोल्हापूरमधून २३, तर हातकणंगले मतदारसंघातून २७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे यंदा दोन्ही मतदारसंघात दोन दोन बॅलेट युनिट लावावी लागणार आहेत. त्यासाठी वाढीव मशीन अन्य जिल्ह्यांतून मागविण्यात येत आहेत. वाढलेल्या उमेदवारांमुळे जिल्हा, निवडणूक प्रशासनाच्या नियोजनाचा मात्र कस लागणार आहे. गेल्या निवडणुकीत कोल्हापुरात १५ आणि हातकणंगलेमध्ये १७ उमेदवार रिंगणात होते.

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ७ मे रोजी मतदान होत आहे. त्यासाठी सोमवारी माघारीची अंतिम मुदत होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार परिषद घेऊन यंत्रणेची माहिती दिली. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे उपस्थित होते.

कोल्हापूरमधून २७ अर्ज वैध ठरले होते, त्यापैकी ४ उमेदवारांनी माघार घेतल्याने २३ उमेदवार रिंगणात आहेत. हातकणंगलेमधून ३२ उमेदवारी अर्ज वैध ठरले, त्यापैकी ५ जणांनी माघार घेतली असून, २७ उमेदवार निवडणूक लढत आहेत. दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांची ही आजवरच्या निवडणुकीतील विक्रमी संख्या आहे. निवडणूक पार पाडण्यासाठी १५ हजार ४९३ कर्मचारी नियुक्त आहेत.

आणखी १४०० मशीन लागणारजिल्ह्यात ३ हजार ३६८ मतदान केंद्रे असून, सध्या प्रशासनाने एक बॅलेट युनिट लागेल या दृष्टीने तयारी केली होती. २ हजार मशीन वाढीव ठेवण्यात आले होते. आता दोन्ही मतदारसंघांत दाेन दोन बॅलेट युनिट ठेवावे लागणार आहे, त्यासाठी आणखी १४०० मशीन लागणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी नोंदविण्यात आली असून, पुणे, सोलापूरसह अन्य ज्या जिल्ह्यांमध्ये जास्तीचे मशीन आहेत त्यांच्याकडून मशीन घेतले जातील.

पुरवणी यादीत ५ हजार मतदार वाढले..निवडणूक विभागाने २३ जानेवारीला मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आता १९ एप्रिलला पुरवणी यादीसह नवीन मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. यानुसार ५ हजार मतदार वाढले असून, कोल्हापूर मतदारसंघातून १९ लाख ३६ हजार ४०३, तर हातकणंगले मतदारसंघातून १८ लाख १४ हजार २७७ असे एकूण ३७ लाख ५० हजार ६८० मतदार मतदानाचा हक्क बजावतील. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान