कोरोनाच्या पेशंटची संख्या वाढतच असल्याने आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत उद्योगपती संजय पाटील वारणा दूध संघाचे संचालक ॲड. एन आर पाटील माजी सरपंच बाळगोंडा पाटील सुनील समुद्रे, उपसरपंच अशोक माळी ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य सेवक सचिन मोरे उपस्थिती यांच्या उपस्थितीत निर्णय घेण्यात आला.
कोरोना बाधित पेशंट दररोज ४ ते ५ ने वाढतच असल्याने याच्यावर उपचारासाठी संजय पाटील यांचे फाउंडेशनच्या वतीने किणी हायस्कूलमध्ये ५० बेडचे कोविड सेंटर उभारणीच्या कामाला सुरुवात केली असून लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तर अँटीजेन टेस्ट चाचणी करण्याची सोय किणी आरोग्य उपकेंद्रामध्ये नियोजन करण्यात येणार आहे तसेच गावात संजय पाटील यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त कोविशिल्ड लस उपलब्ध करून द्यायची व्यवस्था करण्यात येणार असून. कोविड केअर सेंटरसाठी लागणाऱ्या व्हॅनची सोय फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.