कागल
: येथील हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने ५० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. फाउंडेशनचे अध्यक्ष व गोकुळचे संचालक नविद मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विकास पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, शंकर संकपाळ, राजेंद्र पाटील, सुनील माळी, सुकुमार पाटील, जी. एस. पाटील, अरविंद पाटील, वसंत जाधव, शानाजी माने, काका पाटील, नंदकुमार कांबळे, के. व्ही. पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.
ग्रामविकास व कामगार मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते रविवारी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून पुरस्कारांचे वितरण होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता सांगाव रोडवरील मटकरी हॉलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील असतील. कागल, गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मतदारसंघातील बावीस प्राथमिक शिक्षक, तर २८ माध्यमिक शिक्षकांना हे पुरस्कार जाहीर केले आहेत. मुश्रीफ फाऊंडेशन व कागल तालुका राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.