शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

पासपोर्टसाठी रोज ५० मुलाखती; १५० जणांची चौकशी

By admin | Published: April 04, 2017 1:39 AM

कार्यालयात गर्दी : १७ मेपर्यंतची नोंदणी फुल्ल; आतापर्यंत ३०० जणांच्या मुलाखती

कोल्हापूर : येथील पासपोर्ट कार्यालयाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याठिकाणी रोज ५० जणांच्या मुलाखतीची प्रक्रिया होत असून दिवसभरात साधारणत: १५० जण कागदपत्रे आणि अन्य प्रक्रियेची चौकशी करत आहेत. कार्यालय सुरू झाल्यापासून गेल्या नऊ दिवसांत तीनशे जणांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. त्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, कऱ्हाड येथील नागरिकांचा समावेश आहे. परराष्ट्र खात्यामार्फत कसबा बावडा मार्गावरील मुख्य पोस्ट कार्यालयात २५ मार्चला पासपोर्ट कार्यालय कार्यन्वित करण्यात आले. याठिकाणी पासपोर्ट काढण्यासाठी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या कार्यालयात रोज ५० जणांच्या मुलाखतीची प्रक्रिया होते. त्यासाठी प्रत्येक १० जणांची बॅच केली जाते. सकाळी सव्वा नऊ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत या बॅचेस्द्वारे मुलाखत, कागदपत्रांची तपासणी, बायोमेट्रिक्स घेणे, आदी स्वरुपातील प्रक्रिया पूर्ण केली जाते. कार्यालय सुरू झाल्यापासून गेल्या नऊ दिवसांत तीनशे जणांच्या मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पासपोर्टसाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, कऱ्हाड, सोलापूर येथून नागरिक येत आहेत. दर दिवशी साधारणत: १५० जण पासपोर्टसाठीची कागदपत्रे आणि प्रक्रियेच्या चौकशीसाठी येत आहेत. दरम्यान, नागरिकांचा या कार्यालयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे कार्यालय कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, पुणे आणि अहमदनगरसाठी कार्यान्वित असल्याचे पडताळणी अधिकारी शशिकांत नरके यांनी सांगितले. ते म्हणाले, पासपोर्टसाठीची प्राप्त झालेली सर्व कागदपत्रे पुणे कार्यालयाला ई-मेल आणि स्पीड पोस्टाद्वारे रोज पाठविण्यात येतात. १७ मेपर्यंतच्या बॅचेसची नोंदणी फुल्ल झाली आहे. पासपोर्ट काढण्यासाठीची प्रक्रिया अशीपासपोर्ट काढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकाने पहिल्यांदा (६६६.स्रं२२स्रङ्म१३्रल्ल्िरं.ॅङ्म५.्रल्ल) या संकेतस्थळावरील आॅनलाईन अर्ज भरावा. त्यानंतर पासपोेर्ट काढण्याच्या प्रक्रियेचे असलेले १५०० रुपये इतके शुल्क आॅनलाईन अथवा बँकेच्या चलनाद्वारे भरावे. शुल्क भरल्यानंतर आॅनलाईन अर्जात मुलाखतीसाठीचे ठिकाण आणि वेळेची नोंदणी करावी. यानंतर निवडलेल्या ठिकाणी आणि वेळी मुलाखतीसाठी संबंधित कार्यालयात उपस्थित राहावे लागते, अशी माहिती कोल्हापुरातील पासपोर्ट केंद्रामधील पडताळणी अधिकारी शशिकांत नरके यांनी दिली.