शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

यंत्रमागांच्या वीज बिलात ५० पैशांची वाढ

By admin | Published: November 09, 2015 10:59 PM

वस्त्रोद्योगात खळबळ : इंधन अधिभार अनुदान रद्द झाल्याचा परिणाम

इचलकरंजी : यंत्रमाग क्षेत्राला सवलतीचा वीजदर देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला असला तरी प्रत्यक्षात मात्र यंत्रमागधारकांना मिळालेली वीज बिले ४५ ते ५० पैसे प्रतियुनिट अशी वाढून आली असल्याने येथील वस्त्रोद्योगात खळबळ उडाली आहे. यंत्रमाग उद्योगासाठी इंधन अधिभारामध्ये असलेले ५० टक्के अनुदान रद्द झाल्याने वीज बिले वाढून आली आहेत.रोजगाराभिमुख असलेल्या यंत्रमाग क्षेत्रात राज्यात शेतीनंतर अधिक लोक यावर अवलंबून आहेत. त्यामुळे गेली वीस वर्षे यंत्रमाग उद्योगासाठी सवलतीचा वीजदर आहे; पण गतवर्षी सत्तेवर आलेल्या भाजप-सेना सरकारकडून अनुदानाची सवलत रद्द केली आणि विजेचे भाव वाढले. त्यानंतर यंत्रमाग क्षेत्रातील आमदारांची एकजूट करून आमदार सुरेश हाळवणकर यांनी यंत्रमाग क्षेत्रासाठी स्वतंत्र वर्गवारी व सवलतीचा दर असावा, यासाठी आग्रहाची मागणी केली. यंत्रमागासाठी स्वतंत्र वर्गवारी मिळाली; पण विजेचे दर मात्र चढेच राहिले.त्यानंतर आमदार हाळवणकर यांनी वाढलेला विजेचा दर पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला. तेव्हा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यंत्रमागाचे विजेचे दर वाढणार नाहीत, असे आश्वासन दिले. दरम्यान, २८ आॅक्टोबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यंत्रमाग उद्योगाच्या पूर्वीच्या दोन रुपये ५७ पैशांमध्ये फक्त नऊ पैशांची वाढ करून दोन रुपये ६६ पैसे प्रतियुनिट विजेचे दर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता यंत्रमाग उद्योजकांना आॅक्टोबर महिन्याची वीज बिले मिळाली असून, त्यामध्ये ४० ते ५० पैशांची वाढ झाल्याचे दिसत आहे. २७ अश्वशक्तीखालील यंत्रमागधारकांना चार रुपये २६ पैसेप्रमाणे, तर २७ अश्वशक्तीवरील यंत्रमागांसाठी तीन रुपये ६५ पैसे प्रतियुनिट दराने बिले मिळाल्याने येथे चांगलीच खळबळ उडाली आहे.याबाबत यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन म्हणाले, मंत्रिमंडळामध्ये झालेल्या निर्णयाचा परिणाम चालू महिन्याच्या वीज बिलामध्ये दिसत नाही. उलट इंधन अधिभारामध्ये ५० टक्के असलेले अनुदान रद्द झाल्याने वीज बिले वाढून आली आहेत. सध्याच्या सरकारने अशा प्रकारची दिवाळी भेट दिली आहे. (प्रतिनिधी)