शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
3
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
5
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
6
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
7
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
8
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
9
'उद्धव ठाकरेंना बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस करतंय'; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा
10
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
11
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
12
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
13
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
14
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
15
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
16
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
17
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
18
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
19
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
20
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल

प्रवासी वाहनाची योग्यता नसल्यास रोज ५० रुपये दंड, परिवहन आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 4:26 PM

वसुलीवरील स्थगिती उच्च न्यायालयाने उठविली

सतीश पाटीलकोल्हापूर : प्रवासी वाहनांना (फिटनेस) योग्यता प्रमाणपत्र नसेल, तर दररोज ५० रुपये दंड आकारणी केली जाणार आहे. या निर्णयावर गेल्या ८ वर्षांपासून असलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठविली आहे. रिक्षा, टॅक्सी, बससह इतर प्रवासी वाहनांना आता वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राची (फिटनेस) मुदत संपताच, तत्काळ त्याचे नूतनीकरण करून घ्यावे लागणार आहे, अन्यथा संबंधित वाहन मालकाला प्रति दिन ५० रुपयांचा दंड भरावा लागेल.वेळेत दंड न भरल्यास वाहनधारकांना आता आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे, असा निर्णय १७ मे, २०२४ ला निघाला आहे. २०१७ पासून ज्या वाहनांची (फिटनेस) योग्यता प्रमाणपत्र संपले आहे, त्यांना त्या सर्व वर्षांची दंड आकारणी भरावी लागणार आहे.केंद्र सरकारच्या परिवहन विभागाने २०१७ मध्ये व्यावसायिक संवर्गातील (ट्रान्स्पोर्ट) रिक्षा, टॅक्सी, बस, ट्रक इत्यादी प्रकारची सर्व वाहनांचे पासिंग उशिरा केल्यास प्रतिदिवस ५० रुपये असा दंड आकारण्याबाबत निर्णय घेतला होता. याबाबत मुंबई बस असोसिएशन आणि पुण्यातील रिक्षा संघटनांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्याप्रमाणे, सन २०१७ ते १८ प्रवासी मे, २०२४ पर्यंत या निर्णयाला स्थगिती वाहनधारकांना होती. मात्र, आता या निर्णयावरील बसणार फटका स्थगिती हटल्याने राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

रिक्षा, टॅक्सी, बससह इतर प्रवासी वाहनांना आता वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्राची (फिटनेस) मुदत संपताच तत्काळ त्याचे नूतनीकरण करून घ्यावे लागणार आहे, अन्यथा संबंधित वाहन मालकाला प्रति दिन ५० रुपयांचा दंड भरावा लागेल, पण आम्ही या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली आहे. - बाबा शिंदे, अध्यक्ष, राज्य माल आणि प्रवासी वाहतूक संघटना)प्रवासी वाहनांना मालवाहतूक वाहनांचा (फिटनेस) योग्यता प्रमाणपत्र संपले असेल आणि ज्यांनी नूतनीकरण केले नसेल, अशांना प्रतिदिनी ५० रुपये दंड आकारणी केली जाणार आहे. हा नियम जुनाच आहे, याबाबत सन २०१७ पासून न्यायालयात प्रलंबित होता. याचा १७ मेला निकाल लागला आहे. - रोहित काटकर, सहायक प्रादेशिक अधिकारी, कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRto officeआरटीओ ऑफीस