हुपरी (ता. हातकणंगले) येथील कोवीड सेंटरला हसन मुश्रीफ फाऊंडेशन व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्यावतीने पांच कॉन्सन्ट्रेटर मशीन्स देण्यात आली. त्यावेळी नविद मुश्रीफ बोलत होते.
माजी आमदार राजीव आवळे म्हणाले, कोरोना महामारीच्या गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना योद्धा म्हणून संपूर्ण जिल्हा अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे अथक संघर्ष करीत सांभाळला आहे.सामाजिक बांधिलकीतून त्यांनी केलेले हे काम हिमालया एवढे आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाट म्हणाले, हुपरी परिसरातील वाढत्या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील कोविड सेंटरला पाच कॉन्सन्ट्रेटर मशीन देण्यात येत आहेत. यावेळी जीवन प्राधिकरणचे संचालक महावीर गाट, मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार-ढेरे, आरोग्य अधिकारी विद्या बनसोडे, कोविड सेंटरच्या प्रमुख डॉ. माणगावे, डॉ. प्रकाश गिरी, सुनील गाट, बाळासाहेब खैरे, पृथ्वीराज गायकवाड, बाहुबली गाट, राजेंद्र पाटील, अरविंद खेमलापुरे, अविनाश मगदुम, शिवराज देसाई, अभिषेक पाटील, धनाजी करवते अमर कलावंत, तानाजी फडतारे, संकेत कानडे आदी उपस्थित होते. घनश्याम आचार्य यांनी आभार मानले.
फोटो ओळी- हुपरी(ता. हातकणंगले) येथील कोविड सेंटरला नामदार हसन मुश्रीफ फाऊंडेशन व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षावतीने नविद मुश्रीफ यांच्या हस्ते पाच कॉन्सन्ट्रेटर मशीन्स देण्यात आली. यावेळी नानासाहेब गाट, राजीव आवळे, बाहुबली गाट, पृथ्वीराज गायकवाड आदी उपस्थित होते.