भीमगोंडा देसाई - कोल्हापूर जिल्ह्यातील ६ वी ते १२ इयत्तेमध्ये शिकणाऱ्या ५१ टक्के मुली मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिन (बाजारातील पॅड) वापरत नसल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले. सर्वेक्षण अहवालाच्या आधारे सॅनिटरी पॅड मोफत मिळावेत, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्र्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, जिल्हा आरोग्याधिकारी आर. एस. आडकेकर यांनी केलेल्या प्रयत्न केले. जिल्हा नियोजन आराखड्यातून शाळकरी मुलींना मोफत सॅनिटरी पॅड देण्याची घोषणा झाली आहे.जिल्ह्यातील ९१९ शाळांत ६ वी ते १२ इयत्तांमध्ये १ लाख ११ हजार ३०८ मुली शिक्षणाचे धडे घेतात. अज्ञानापोटी किंवा विविध कारणांमुळे दरमहाच्या मासिक पाळीवेळी सॅनिटरी पॅड न वापरता निर्जंतुकीकरण नसलेले घरगुती कापड वापरतात. परिणामी, कॅन्सूरसारखे आजार होतात. जंतुसंसर्ग होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे आरोग्य विभागाने ७३ प्राथमिक आणि ४१३ उपकेंद्रांतील महिला आरोग्याधिकारी यांच्यातर्फे १५१ शाळांना भेट देऊन ९ हजार ८३६ मुलींशी थेट संवाद साधून विहित नमुन्यातील प्रश्नावली भरून घेतली.निष्कर्ष अहवालातील माहितीनुसार ३ हजार ३५१ मुली पॅड वापरतात. उर्वरित ४ हजार ७३९ मुली घरगुती कापडाचा वापर करतात. मासिक पाळीविषयी शास्त्रीय माहिती २४७९ मुलींना नाही. वर्तमानपत्र, टीव्ही, रेडिओ या माध्यमांतून २११ जणींना, तर पुस्तकांमधून २०९ जणींना, मैत्रिणींंकडून १४६५ जणींना, आईकडून ४१२५ जणींना, नर्सकडून १३४७ जणींना शास्त्रीय कळल्याचे पुढे आले आहे. सरासरी दिवसातून किती सॅनिटरी पॅड किंवा कापडाची आवश्यकता आहे हे १२९ जणींना माहीत नाही. बाजारातून पॅड आणावयाचे झाल्यास दरमहा खर्च किती होतो याची तब्बल १३०२७ मुलींना माहिती नाही. दरमहा लागते म्हणून धुऊन कापडाचा वापर करणे, जागृतीचा अभाव, खेड्यातील मुलींना मेडिकल स्टोअर्समध्ये जाऊन खरेदीचा संकोच अशी प्रमुख कारणे सॅनिटरी पॅड न वापरण्याची आहेत, हेही दिसून आले आहे. आर्थिक कुवत नाही म्हणून नव्हे, तर अज्ञानापोटी मासिक पाळीदरम्यान घरगुती कापड वापरतात, असेही सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. जागृती व्हावी आणि सवय लागावी म्हणून सर्व मुलींना मोफत सॅनिटरी पॅड देण्याचा प्रस्ताव तयार केला. - डॉ. आर. एस. आडकेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी...तरच शाळेला उपस्थितदरमहा मासिक पाळीवेळी शाळेत ४१५ मुली गैरहजर राहतात. सॅनिटरी पॅड मिळाल्यास गैरहजर मुलींनीही शाळेत नियमित हजर राहतो, असे सांगितले आहे. पाळीसंबंधी शास्त्रीय माहिती आईकडूनच अधिकाधिक मुलींना कळली आहे. पॅडच्या महत्त्वासंबंधी आईही अज्ञानी असल्याने निम्याहून अधिक मुली पॅड वापरत नसल्याचे स्पष्ट होते.
५१ टक्के मुली ‘सॅनिटरी पॅड’पासून लांब
By admin | Published: January 30, 2015 12:12 AM