कोल्हापूर : हंगामातील पहिला हापूस आंबाकोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत दाखल झाला. यावेळी लागलेल्या बोलीत आंब्याला सोन्याचा दर मिळाल्याने आंबा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. मुहूर्ताच्या पहिल्याच सौद्यात पाच डझनाच्या पेटीला ५१,००० रुपयांचा भाव मिळाला आहे. खासदार धनंजय महाडिकांनी ही उच्चाकी बोली लावत कोल्हापुरातील पहिली आंब्याची पेटी घेतली.बाजार समितीमध्ये आज, शनिवारी (दि.७) सकाळी पहिला सौदा खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते काढण्यात आला. यावेळी यावर्षीचा सर्वात उच्चांकी दर कोल्हापुरात मिळाला. भारमठ (ता. देवगड) येथील शेतकरी सुहास दिंदास गोवेकर यांचा हापूस आंबा खासदार धनंजय महाडिक यांनी बोली लावत ५१, ००० रुपयाला खरेदी केला.लिलावात ५,००० रुपयापांसून सुरू झालेला दर हा तब्बल ५१ हजार रुपयांपर्यंत पोहोचला. यावेळी धनंजय महाडिक यांनी उच्चाकी बोली लावत तब्बल ५१ हजार रुपयाला आंबा खरेदी केला. पाच डझनाला सुमारे ५१ हजार रुपये दर मिळाल्याने एका डझनाचा दर कमीत-कमी दहा हजार दोनशे रुपये होतो. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना आंब्याची गोडी चाखण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हापूस आंब्याला सोन्याचा दर! खासदार धनंजय महाडिकांनी घेतली कोल्हापुरातील पहिली पेटी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 3:44 PM