शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

तीन वर्षांत ५,२५४ गर्भपात

By admin | Published: February 03, 2015 11:42 PM

जिल्ह्यातील संख्या चिंताजनक : सर्वांत कमी मुलींचा दर असलेल्या ‘करवीर’चा सर्व्हे करणार

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -जिल्ह्यात २०११ सालापासून गेल्या तीन वर्षांत तब्बल ५,२५४ महिलांनी गर्भपात केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून दरवर्षी गर्भपात करणाऱ्या मातांची संख्या वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. गर्भपाताची नेमकी कारणे कोणती, याचा शोध घेण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर जिल्ह्यात सर्वांत कमी मुलींचा जन्मदर असलेल्या करवीर तालुक्याची निवड आरोग्य विभागाने केली आहे. या तालुक्यात गर्भपात करून घेतलेल्या २०१ महिलांची भेट घेऊन त्यांच्याकडून गर्भपाताची कारणमीमांसा जाणून घेतली जाणार आहे. दरवर्षी आरोग्य विभाग अंगणवाडी सेविका व प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा सेविका यांच्या माध्यमातून गर्भपात करणाऱ्या महिलांची नोंद ठेवते. या नोंदीतील आकडेवारीनुसार गेल्या तीन वर्षांत प्रत्येकवर्षी गर्भपात करणाऱ्यांच्या संख्येत सरासरी ३०० ते ५०० अधिक वाढ नोंदविली आहे. विशेष म्हणजे शहरी आणि सधन भागात गर्भपाताचे प्रमाण अधिक आहे. प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे गर्भचिकित्सेची सुविधा शहर, तालुका, निमशहर या ठिकाणीही सहजपणे उपलब्ध आहे. गर्भधारणा झाल्यानंतर चिकित्सेत लिंग निदान, शारीरिक व्यंग निदर्शनास येते. प्रसूतीच्यावेळी धोका असल्याचेही आधीच समजते. शारीरिक व्यंग आणि मातेच्या जिवाला धोका असल्यास डॉक्टरच गर्भपाताचा सल्ला देतात. या कारणांसाठी गर्भपात करण्यावर कोणाचा आक्षेप नाही. परंतु, लिंगनिदान करून स्त्रीभ्रूणाचा गर्भपात करून घात करणे कायद्याने गुन्हा आहे. स्त्रीभ्रूणाची हत्या वाढल्यानेच समाजात मुलींची संख्या झपाट्याने खालावत आहे. म्हणूनच आरोग्य विभाग स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने दोन वर्षांपासून व्यापक जागृती करीत आहे. २०११-१२ या वर्षात १३४९ महिलांनी गर्भपात केल्याची नोंद आहे. पुढील २०१२-१३ या वर्षात यामध्ये वाढ होऊन हा आकडा १६०१ इतका नोंदविला गेला. गेल्या वर्षात तब्बल ७०३ गर्भपातांची अधिक नोंद झाली असून हाच आकडा २३०४ इतका झाला आहे. हे प्रमाण चिंताजनक असून मुलगाच हवा याच मानसिकतेतून स्त्रीभ्रूण असल्यास गर्भपाताचे प्रमाण वाढले असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पुढे येत आहे. मात्र, गर्भपाताचे नेमके कारण शोधून उपाययोजना करण्यासाठी पहिल्या टप्प्यात करवीर तालुक्यातील गर्भपात करून घेतलेल्या मातांची माहिती संकलित केली जाणार आहे व त्यांच्याशी संवाद साधून अहवाल बनविला जाणार आहे. गर्भपाताचे नेमके कारण शोधण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर करवीर तालुक्याच्या सर्व्हेला लवकरच सुरुवात होईल. सर्व्हेत गर्भपात करून घेतलेल्या मातांची महिला आरोग्य कर्मचारी यांच्यातर्फे थेट संवाद साधून प्रश्नावली स्वरूपात माहिती घेण्यात येणार आहे. - डॉ. आर. एस. आडकेकर,जिल्हा आरोग्य अधिकारी