शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
5
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
6
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
7
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
8
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
9
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
10
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
11
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
12
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
13
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
14
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
15
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
16
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
17
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
18
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
19
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान

Kolhapur News: अग्निवीर भरती प्रक्रियेत ५३६ उमेदवार पात्र, १६७ मधून एकाची निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 3:34 PM

तीन ते पाच फेब्रुवारीदरम्यान रिपोर्टिंग

कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर २२ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर दरम्यान पार पडलेल्या अग्निवीर सैन्य भरती प्रक्रियेचा निकाल रविवारी (दि. २९) सैन्य दलाच्या संकेतस्थळावर जाहीर झाला. अग्निवीर जनरल ड्यूटी, टेक्निकल आणि ट्रेडसमन पदांसाठी ५३६ उमेदवार पात्र ठरले आहेत.कोल्हापुरात पार पडलेल्या सैन्य दलातील अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी सुमारे ९० हजार उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले होते. जनरल ड्यूटी पदांसाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह गोव्यातील उमेदवारांना बोलावण्यात आले होते. तर नर्सिंग पदांसाठी संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यातील उमेदवार उपस्थित होते. जनरल ड्यूटी पदांच्या भरती प्रक्रियेचा निकाल रविवारी जाहीर झाला. पात्र ठरलेल्या ५३६ उमेदवारांचे क्रमांक संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.तीन ते पाच फेब्रुवारीदरम्यान रिपोर्टिंगपात्र ठरलेल्या उमेदवारांना कोल्हापुरातील टेंबलाई टेकडी येथील सैन्य दलाच्या एआरओ कार्यालयात तीन ते पाच फेब्रुवारीदरम्यान हजर राहण्याच्या सूचना सैन्य अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. हजर होताना सर्व शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईजचे फोटो आवश्यक आहेत.

१६७ मधून एकाची निवडअग्निवीर भरतीसाठी तरुणांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. अवघ्या चार वर्षांची नोकरी असली तरी त्यासाठी ९० हजार तरुणांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले. उदंड प्रतिसादामुळे एका जागेसाठी तब्बल १६७ उमेदवारांना संघर्ष करावा लागला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर