वारणा दूध संघाच्या मुख्य दुग्धालयात सकाळी संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव यांच्या शुभहस्ते महापूजा झाली. तर प्रधान कार्यालयाच्या दालनात स्वर्गीय तात्यासाहेब कोरे व स्वर्गीय डॉ. भाऊसाहेब गुळवणी यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्या हस्ते झाले.
वारणा दूध संघाच्या अतिथीगृहात आयोजित रक्तदान शिबिरातील सहभागी रक्तदात्यांना संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे, उपाध्यक्ष एच. आर. जाधव, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर व संचालकांच्या हस्ते भेटवस्तू व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी संघातील १०१ जणांनी रक्तदान केले. तसेच नवी मुंबई येथील वारणा दूध संघाच्या शाखेमार्फत नेत्र तपासणी शिबिरात कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या वेळी संचालक अभिजित पाटील, शिवाजी कापरे, शिवाजी मोरे, अॅड. एन. आर. पाटील, राजवर्धन मोहिते, महेंद्र शिंदे, माधव गुळवणी, शिवाजी जंगम, दीपक पाटील, अरुण पाटील, लालासो पाटील, चंद्रशेखर बुवा, व्ही. टी. पाटील, के. आर. पाटील, डॉ. मिलिंंद हिरवे, मयूर पाटील, अकौटंसचे सुधीर कामेरीकर, मार्केटिंगचे अनिल हेर्ले, आर. व्ही. देसाई, शेती अधिकारी अशोक पाटील, अनिल लंबे, कामगार संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र जाधव, लालासो देसाई, उत्तम कणेरकर, सचिन माने, स्वातंत्र्यकुमार कानडे, डॉ. जीवन सगरे, डॉ. प्रकाश गाडवे, प्रमोद मंगसुळे, सतीश नंदूरकर, बाजीराव शेवाळे, सागर माळी, अरुण नरबळ आदी उपस्थित होते. वैभवी लक्ष्मी ब्लड बँक, महात्मा गांधी ब्लड बँक व अर्पण ब्लड बँकांनी रक्त संकलित केले.
फोटो ओळी :
तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा सहकारी दूध संघाच्या ५३ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिरातील रक्तदात्यांना वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव व कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कार केला. या वेळी सर्व संचालक, अधिकारी.