शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

Kolhapur: बलभीम संस्थेतील ९० लाखांच्या अपहारप्रकरणी माजी अध्यक्षांसह ५४ जणांवर ठपका, व्याजासह होणार वसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 12:27 PM

कोपार्डे : खुपीरे (ता. करवीर) येथील बलभीम सेवा संस्थाच्या संचालक मंडळावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत सहकार न्यायालयात तात्कालीन अध्यक्ष, संचालक ...

कोपार्डे : खुपीरे (ता. करवीर) येथील बलभीम सेवा संस्थाच्या संचालक मंडळावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत सहकार न्यायालयात तात्कालीन अध्यक्ष, संचालक व इतर ५४ व्यक्तींच्या विरोधात वसुलीचे दावे दाखल आहेत. चौकशीत सहायक निबंधक संभाजी पाटील यांनी गुळ ॲडव्हान्स व प्रशासकीय अहवालातील मुद्याने ४७ जणांवर ९० लाख ६३ हजार ३०६ रुपये अपहाराबाबत वैयक्तिक जबाबदारी निश्चित केली आहे. ही रक्कम १२ टक्के व्याजासह जमा करण्याचे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.बलभीम विकास संस्थेच्या २०१६ ते २०२१ संचालक मंडळाने भ्रष्टाचार केल्याची तक्रार सभासद प्रकाश चौगुले,गौतम पाटील,सरदार बंगे,सागर चौगले यांनी सहकार निबंधकांकडे केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने शासकीय लेखा परीक्षक अनिल पैलवान यांनी लेखापरीक्षण करून अपहार केल्या प्रकरणी दोन वर्षापूर्वी करवीर पोलिस ठाण्यात माजी अध्यक्ष व संचालकावर अपहाराची रक्कम वसुलीचे दावे दाखलही केले.

सहायक निबंधक संभाजी पाटील यांनी कलम ८८ अन्वये चौकशी सुरू केली. चौकशीत दाव्यातील गुळ ॲडव्हान्स पोटी अडत विभागाच्या धोरणानुसार गुळ ॲडव्हान्स देताना गुळ आवक व मूल्यांकनाबाबत खात्री करून ॲडव्हान्स अदा केलेला नाही, तत्कालीन संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी दक्षता न घेता गुळ ॲडव्हान्स रक्कम अदा केल्याने संस्थेच्या निधीचा गैर विनियोग केला आहे. गुळ ॲडव्हान्सच्या रक्कम या ॲडव्हान्स स्वरूपात दिलेल्या आहेत, ॲडव्हान्स रक्कम अद्याप वसूल झालेल्या नाहीत.संचालकांनी लेखी खुलासे कोणत्याही कागदपत्राशिवाय मांडल्याने सादर केलेले म्हणणे ग्राह्य मानता येत नाहीत. त्यामुळे या रकमांची संचालक मंडळावर वैयक्तिकरीत्या जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचा ठपका चौकशीत ठेवण्यात आला आहे. कलम ८८ अन्वये निश्चित करण्यात आलेली संचालकावर ९० लाख ६३ हजार ३०६ रूपये रक्कम १२ टक्के व्याजासह संचालकांकडून वैयक्तिकरीत्या वसूल करण्यात यावी असे चौकशी अधिकारी पाटील यांनी अहवालात नोंदवले आहे.

  • गुळ ॲडव्हान्स रकमेतून केलेला अपहार - ७४ लाख ८८ हजार ५१
  • प्रशासकीय अहवालातील मुद्द्याचे अनुषंगाने वसुली रक्कम - १५ लाख ६४ हजार ७८८

संस्थेतील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी दोन वर्षे लढा दिला. तत्कालीन संचालकांकडून व्याजासह ही रक्कम परत करण्याचे आदेश झाल्याने न्याय मिळाला आहे - प्रकाश चौगले (तक्रारदार)

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजी