शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

कोल्हापूर पूर : अलमट्टीतून 540000, कोयनेतून 48893 तर राधानगरीतून 1400 क्युसेक विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 1:11 PM

अलमट्टी धरणातून 5 लाख 40 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज सकाळी 8.30 वाजता बंद झाले असून, सध्या धारणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणामधून 48893 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी आज दिली.

ठळक मुद्देअलमट्टीतून 540000, कोयनेतून 48893 तर राधानगरीतून 1400 क्युसेक विसर्गकोयना धरणामधून 48893 क्युसेक पाण्याचा विसर्ग

कोल्हापूर : अलमट्टी धरणातून 5 लाख 40 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे आज सकाळी 8.30 वाजता बंद झाले असून, सध्या धारणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणामधून 48893 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी आज दिली.पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी 7 वाजता 49 फूट असून, एकूण 84 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.21 टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे. कासारी नदीवरील- वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन व यवलूज. तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी. वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी, क.वाळवे, तुरूंबे व सुळंबी. कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे (खा), वेतवडे, मांडूकली, असळज, सांगशी व काताळी. वेदगंगा नदीवरील- गारगोटी, निळपण, वाघापूर व शेणगाव बंधारे पाण्याखाली आहेत.

हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐणापूर, गिजवणे, जरळी, खंदाळ, निलजी, हरळे, गजरगाव व दाबीळ. घटप्रभा नदीवरील- बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी. ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, कोवाड, दुंडगे, कामेवाडी व ढोलगरवाडी. शाळी नदीवरील- येळावणे, कोळगाव व टेकोली. धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे व पनोरे. असे एकूण 84 बंधारे पाण्याखाली आहेत.

नजिकच्या अलमट्टी धरणात 100.786 टीएमसी पाणी साठा आहे, तर कोयना धरणात 102.55 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 3.27 टीएमसी, वारणा 32.46 टीएमसी, दूधगंगा 24.14 टीएमसी, कासारी 2.66 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.53 टीएमसी, पाटगाव 3.72 टीएमसी, चिकोत्रा 1.39, चित्री 1.88 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 49 फूट, सुर्वे 46.11 फूट, रुई 77.9 फूट, इचलकरंजी 76 फूट, तेरवाड 80.10 फूट, शिरोळ 76.7 फूट, नृसिंहवाडी 76.7 फूट, राजापूर 62.1 फूट तर नजीकच्या सांगली 51.2 फूट आणि अंकली 56.9 फूट अशी आहे.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरkolhapurकोल्हापूर