शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
2
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
3
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
4
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
5
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
6
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
7
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
8
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
9
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
10
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
11
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
13
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
14
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
15
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
16
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
17
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
18
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
19
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
20
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...

राज्य सरकारची जाहिरातींवर ५५० कोटी रुपयांची उधळपट्टी, आमदार रोहित पवार यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 5:38 PM

इचलकरंजी : राज्यावर ४० ते ५० हजार कोटी रुपयांची उधारी आहे. असे असाताना देखील राज्य सरकारने जाहिरातींवर ५५० कोटी ...

इचलकरंजी : राज्यावर ४० ते ५० हजार कोटी रुपयांची उधारी आहे. असे असाताना देखील राज्य सरकारने जाहिरातींवर ५५० कोटी रुपये उधळले आहेत, असा आरोप शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला.येथील जवाहरनगरमध्ये श्रीराम ट्रस्टच्या वतीने दसऱ्यानिमित्त आयोजित ५१ फुटी रावण दहन कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार पवार म्हणाले, महागाई व भ्रष्टाचार वाढवणारा विचार येत्या विधानसभेला पराभूत करायचा आहे. राज्याच्या राजकारणात ५० हा आकडा महत्त्वाचा आहे. तो भ्रष्टाचाराचा प्रतिकही आहे. त्यामुळे ५० फुटी रावण दहन करायचे आहे. समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. जनतेच्या हाताला काम, पोटाला अन्न आणि पुरोगामी विचाराची गरज आहे. देशातील राजकारणामध्ये नेत्यांचे भले होते. मात्र, सामान्यांचे भले होत नाही.मदन कारंडे यांनी, यापूर्वी शहरामध्ये राजाराम मैदानावर होत असलेल्या रावण दहन कार्यक्रमाचा आवर्जून उल्लेख केला. माजी आमदार राजीव आवळे यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्याचे सांगितले. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. रावण दहन व सोनं लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी राहुल खंजिरे, सुहास जांभळे, अब्राहम आवळे, राजू आलासे, सयाजी चव्हाण, गणेश पवार, मंगेश कांबुरे, नितीन कोकणे, दशरथ माने, मदन जाधव, आदी उपस्थित होते.

लक्षवेधी देखावे५१ फुटी रावणाबरोबरच दसऱ्याच्या या कार्यक्रमानिमित्त राम-सीता-लक्ष्मण आणि हनुमान यांच्या वेशभूषेतील कलाकार सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ताशांच्या कडकडाटात तुतारीचा आवाज आणि राम-कृष्ण-हरीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीRohit Pawarरोहित पवारGovernmentसरकार