कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण या पाच जिल्ह्णांत ५५८ उपद्रवी गावे आहेत. या गावांतील हालचालींवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले आहे. मतदान व मतमोजणीदरम्यान २५ हजार पोलिस, ८९२ वाहने, ७२२ वायरलेस सेट, २८३ वॉकी-टॉकी असा सशस्त्र बंदोबस्त आहे, अशी माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकारांना दिली.ग्रामीण विकासाचे केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे वारे तापले आहे. पक्षासह प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने या निवडणुका चुरशीच्या होत आहेत. मतदान व मतमोजणी या दोन दिवसांत वादावादीचे, हाणामारीचे प्रकार घडू शकतात. संवेदनशील गावांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. परिक्षेत्रातील पोलिस रेकॉर्डवरील १६ हजार गुन्हेगारांवर कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले. +परिक्षेत्रातील पोलिस बंदोबस्तपोलिस अधीक्षक ५अप्पर पोलिस अधीक्षक ७पोलिस उपअधीक्षक ६०पोलिस निरीक्षक ११४स.पो.नि., उपनिरीक्षक ७५३पोलिस कर्मचारी १६१०९एसआरपीएफ १५ कंपनी१८७५होमगार्ड महिला, पुरुष ६३२७वाहने ८९२वायरलेस सेट ७२२वॉकी-टॉकी २८३परिक्षेत्रातील संवेदनशील गावेकोल्हापूर ११८सांगली ४०सातारा ११४पुणे ग्रामीण १९०सोलापूर ग्रामीण ६६कोल्हापूर जिल्ह्यातील संवेदनशील गावेकरवीर - वडणगे, निगवे दुमाला, वाकरे, सडोली खालसा, माळ्याची शिरोली, कसबा बीड, गांधीनगर, चिंचवाड.राधानगरी - सरवडे, वाळवेहातकणंगले - हातकणंगले, वडगाव, शिवाजीनगर, शहापूर, हुपरी, सरवडे, कसबा वाळवे, रुकडी, अतिग्रे, भादोले, पारगाव, कबनूर, कोरोची, पट्टणकोडोली.आजरा - आजरा, उत्तूर, किणे.कागल - मुरगूड, कागल, यमगे, हमीदवाडा, लिंगनूर, पिंपळगाव खुर्द, निढोरी, सेनापती कापशी, कसबा सांगाव, व्हनाळी, म्हाकवे, बेलवळे बु, साके, बाचणी.शाहूवाडी - शाहूवाडी, कडवे, भेडसगाव, सरुड, बांबवडे, साळशी, भुदरगड - मुधाळ, म्हसवे, कडगाव, गंगापूर.चंदगड - चंदगड, नागनवाडी, हलकर्णी, राजगोळी, गवसे.पन्हाळा - पन्हाळा, कळे, कोडोली, आसुले-पोर्ले, यवलूज, बाजारभोगाव, पुनाळ, कोडोली, आरळे, सातवे.गगनबावडा - गगनबावडा, असळज, तिसंगीशिरोळ - शिरोळ, कुरुंदवाड, औरवाड, यड्राव. ाडहिंग्लज - गडहिंग्लज, नेसरी, भडगाव, कसबा नूल, नेसरी, बटकणंगले.
पाच जिल्ह्यांत ५५८ गावे उपद्रवी
By admin | Published: February 19, 2017 1:12 AM