कोल्हापूर : देश चालविण्यासाठी ५६ पक्ष लागत नाहीत. त्यांच्यावर भरवश्यावर देश चालत नाहीत. ५६ इंचाची छाती लागते. शेतकरी, सर्वसामान्यांच्या पाठीशी राहणारे आमचे पक्ष आहे. भाजप, सेना आणि मित्रपक्षांच्या माध्यमातून जनतेच्या पाठबळावर बलशाली सरकार सत्तेमध्ये येणार आहे. आता केवळ लीड मोजणे बाकी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे केले.येथील तपोवन मैदानावर भाजप-शिवसेना युतीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार प्रारंभ सभेमध्ये ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईत अरबी महासागर आणि कोल्हापुरात जनतेचा महासागर. आम्ही एकत्रपणे पुढे जात आहोत. भाजप-सेनेची युती सत्तेसाठी नाही. विचारांची युती आहे. आमचा हिंदुत्ववाद संकुचित नाही. जाती, भाषेच्या पलीकडील हिंदुत्ववाद आहे. केवळ नावामध्ये राष्ट्रवादी असून चालत नाही. मनात राष्ट्रवाद असावा लागतो.
राष्ट्रभक्ती घेऊन आम्ही मैदानात आलो आहोत. विरोधकांना उमेदवार मिळत नाहीत. त्यांच्या कॅप्टनने माढ्यातून माघार घेतली आहे. त्यांची तिकीटे उमेदवार परत करीत आहेत. प्रचंड मतांनी युतीचे सरकार पुन्हा सत्तेत येईल. गरीब ही काँग्रेसवाल्यांच्या नेत्याच्या चेल्या-चापट्यांची. तुमच्या १५ वर्षांचे आकडे घेऊन या, आम्ही साडेचार वर्षात केलेल्या कामाचे आकडे त्यांच्यापेक्षा जास्त आहेत. देशातील शेतकरी, गरीबांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजना राबवून बळ दिले.
कोल्हापूरच्या भूमीने परिवर्तन घडविलेकोल्हापूर हे शक्तीपीठ आहे. आई अंबेचे शक्तीपीठ, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन कोल्हापूर आहे. विकास, परिवर्तनाच्या कृतीचा प्रारंभ या नगरीतून व्हावा, याउद्देशाने युतीने प्रचाराचा प्रारंभ येथून केला. कोल्हापूरच्या भूमीने देशात परिवर्तन घडविले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
सुपारी घेऊन बोलण्यापेक्षा घरी बसाआमचे कपडे उतरविणारा अजून जन्माला आला नाही. बारामतीच्या पोपटाच्या अंगावर एकही कपडा शिल्लक नाही. सुपारी घेऊन बोलण्यापेक्षा दुपारी घरी बसा. मोदी हे सूर्यासारखे आहेत. हे लक्षात घ्यावे, अशी टीका राज ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
तुमची भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनीजर, आमची इव्हेंट कंपनी म्हणत असला, तर तुमची भ्रष्टाचार मॅनेजमेंट कंपनी असल्याची टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादीवर केली. पश्चिम महाराष्ट्रातील सामना १० विरुद्ध शून्य असा फरकाने युती जिंकणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.