समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आणीबाणीवेळी कारावास भोगलेल्या जिल्ह्यातील ५८ जणांना मासिक १0 हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. या सर्वांना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या सहीचे मंजुरी आदेश मिळाले असून, यासाठी लागणाऱ्या निधीची शासनाकडे मागणी करण्यात आली आहे.मिसाबंदी आणि आणीबाणीमध्ये एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्यांना मासिक दहा हजार रुपये मानधन, त्यांच्या पश्चात पत्नीस ५ हजार रुपये मानधन, एक महिन्यापेक्षा कमी कालावधी कारावास भोगला असेल, तर ५ हजार रुपये मासिक मानधन आणि पश्चात पत्नीस २५00 रुपये मानधन, अशी योजना महाराष्ट्र शासनाने जाहीर केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले होते.त्यानुसार ५८ प्रकरणे मंजूर करण्यात आली असून, तशी पत्रे संबंधितांना पाठविली आहेत. यामध्ये करवीर-११, हातकणंगले २५, राधानगरी १८, आजरा २, भुदरगड १ अशा प्रकरणांचा समावेश आहे.यातील उर्वरित ५७ प्रकरणांमधील कागदपत्रांची छाननी अजूनही सुरू आहे. यातील काहीजणांनी दुसºया जिल्ह्यात कार्यरत असताना कारावास भोगला असताना त्यांचे सध्या कोल्हापूर जिल्ह्यात वास्तव्य असल्याने येथील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केले आहेत; मात्र याबाबतीत शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात येणार आहे. काही प्रकरणांमध्ये नेमका किती कारावास झाला होता? याचा अर्जामध्ये उल्लेखच केलेला नाही.‘लोकमत’मुळे कुंभार यांना मदतआजरा येथील बंडा कुंभार यांची व्यथा ‘लोकमत’ने ३ सप्टेंबर २0१८ रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. हे वृत्त वाचल्यानंतर त्याच दिवशी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख यांची भेट घेऊन कुंभार यांची कागदपत्रे मिळावीत, अशी मागणी केली होती. अखेर कुंभार यांना मासिक दहा हजार रुपये मानधनाचे जिल्हाधिकाºयांचे पत्र मिळाले आहे.
आणीबाणीतील ५८ जणांना मासिक दहा हजार मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:33 AM