कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाची उघडझाप राहिली. गगनबावडा व शाहूवाडी तालुक्यांत जोरदार पाऊस राहिला; तर उर्वरित तालुक्यांसह कोल्हापूर शहरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आज, रविवारी उन्हाचा तडाखाही असला तरी सायंकाळी जोरदार पाऊस कोसळेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. जिल्ह्यातील राधानगरी धरणात ५९.५६ दलघमी पाणीसाठा आहे.आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ४९.४१ दलघमी, वारणा ३८२.४६ दलघमी, दूधगंगा २१५.९१ दलघमी, कासारी २१.५७ दलघमी, कडवी २६.२४ दलघमी, कुंभी २९.४८ दलघमी, पाटगाव ३९.०३ दलघमी, चिकोत्रा १८.३८ दलघमी, चित्री २०.३८ दलघमी, जंगमहट्टी ९.१२ दलघमी, घटप्रभा ३२.१८ दलघमी, जांबरे ११.१८ दलघमी, आंबेआहोळ १.२१, कोदे (ल.पा) १.८९ दलघमी असा आहे.
सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा -
गगनबावडा (३८.८), हातकणंगले (१.३), शिरोळ (०.४), पन्हाळा (९.४), शाहूवाडी (२४.७), राधानगरी (२.८), करवीर (३.६), कागल (२), गडहिंग्लज (२), भुदरगड (३), आजरा (३.४), चंदगड (२.९).
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम ११.७ फूट, सुर्वे १३.२ फूट, रुई ३९ फूट, तेरवाड ३४.३ फूट, शिरोळ २३.० फूट, नृसिंहवाडी १९.३ फूट, राजापूर ११.३ फूट तर नजीकच्या सांगली ८.९ फूट व अंकली ४.७ फूट अशी आहे.
शनिवारी गगनबावडा, शाहूवाडीत जोरदार पाऊस
कोल्हापुरात मान्सून सक्रिय झाला असला तरी त्याला जोर लागेना. शुुक्रवारी (दि. ११) सायंकाळी अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला; मात्र शनिवारी सकाळपासून त्याने पु्न्हा उघडीप दिली. सकाळच्या टप्प्यात कडकडीत ऊन पडले. दुपारी अधूनमधून ढगाळ वातावरणासह काेल्हापूर शहरात पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. गगनबावडा, शाहूवाडी, आजरा, पन्हाळा तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. करवीर, हातकणंगले, कागल, गडहिंग्लज, शिरोळ तालुक्यांत अधूनमधून नुसती भुरभुर राहिली.