किणी : किणी (ता. हातकंणगले) येथील ग्रामपंचायतीच्या १७पैकी ६ जागा बिनविरोध झाल्या असल्याची माहिती पॅनेलप्रमुख संजय पाटील व ॲड. एन. आर. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गावचा सर्वांगिण विकास व्हावा आणि नागरिकांच्यात सामंजस्यता यावी, या उद्देशाने संपूर्ण गावची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. किणी गावची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध व्हावी, जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून नावलौकिकास यावे आणि शासनाकडून गावच्या विकासासाठी विविध माध्यमातून विकास निधी मिळावा, यासाठीही आमचे प्रयत्न सुरू आहेत. अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेऊन बिनविरोधसाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. १७पैकी ६ जागांवर प्रत्येकी एकच उमेदवार असल्याने ६ सदस्य बिनविरोध झाले आहेत. उर्वरित ११ जागांवर एकाहून अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
बिनविरोध झालेले सदस्य - प्रभाग क्रमांक १ : रेश्मा बंदेनवाज मुजावर
प्रभाग क्रमांक २ : अशोक सहदेव माळी.
प्रभाग क्रमांक ३ : प्रियांका कुंतुनाथ मगदूम व विद्या विजय पाटील
प्रभाग क्रमांक ४ : सुशीला वैभव कुंभार
प्रभाग क्रमांक ५ : हसीना दस्तगीर पेंढार.
या पत्रकार परिषदेस विक्रांत पाटील, बाळगोंडा पाटील, महावीर पाटील, सुनील पाटील, हर्षद पाटील, हंबीरराव पाटील, बाळासाहेब पाटील, संभाजी चव्हाण, अमित दणाणे, राहुल जाधव उपस्थित होते.
----