कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांमध्ये ६० कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. गेल्यावर्षी कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासूनची ही सर्वाधिक मृत्युसंख्या आहे. यामध्ये जिल्ह्यातील ५० जणांचा, तर अन्य जिल्ह्यांतील १० जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यात नव्याने कोरोनाचे १,०८६ रुग्ण आढळले असून, एकूण उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ११ हजार ४१३ वर पोहोचली आहे. दिवसभरामध्ये ६५७ जण कोरोनातून बरे झाले आहेत. १,७९९ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, १,८७६ जणांचा स्वॅब घेण्यात आला आहे. १,४२६ जणांची अँटिजन चाचणी करण्यात आली आहे.
कोल्हापूर शहरामध्ये ३०८ नवे रुग्ण आढळले असून, शिरोळ तालुक्यात १४८, करवीर तालुक्यात १४७ रुग्ण, तर हातकणंगले तालुक्यात ११५ नवे रुग्ण नोंदविण्यात आले आहेत.
चौकट
करवीर तालुक्यात सर्वाधिक मृत्यू
कोल्हापूर शहर ०८
शिवाजी पेठ, हनुमान मंदिर, साने गुरुजी वसाहत, दौलतनगर, फुलेवाडी, रामानंदनगर, राजारामपुरी.
करवीर तालुका १०
केर्ली, शिरोली दुमाला, वसगडे पाचगाव ०२, उचगाव ०३, हिरवडे दुमाला, महे/////
हातकणंगले ०८
चंदूर, चवरे, कबनूर, शाहू कॉनर्र, हुपरी, अतिग्रे, कोरोची, कुंभोज.
इचलकरंजी ०७
इचलकरंजी ६, खोतवाडी ०१.
शिरोळ ०५
कुरूंदवाड, अब्दूललाट, शिरढोण, शिरोळ, हेरवाड
गडहिंग्लज ०४
कडगाव, महागाव, नदीवेस गडहिंग्लज, कौलगे
भुदरगड ०२
कोरेवाडी, दोनवडे
कागल ०२
म्हाकवे, कागल
गगनबावडा ०१
वेसर्डे
शाहूवाडी ०१
कडवे
राधानगरी ०१
वाकेघोल
आजरा ०१
भादवण
इतर राज्यातील, जिल्ह्यातील १०
खराडी पुणे, बत्तीस शिराळा, तांदूळवाडी, मिरज, धबधबाट्टी, सलगरे, निपाणी, गोठण पळशी, दापोली, शेडबाळ
चौकट
मृत्यू रोखण्याचे आव्हान
गेल्या पंधरवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने नागरिक मृत्यु पावत आहेत. त्यामुळे ही वाढती संख्या रोखणे प्रशासनासमोर आव्हान आहे. त्यामुळे डेथ ऑडिटचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले आहे.