कोल्हापूर : कोल्हापूर-तिरूपती मार्गावरील फर्स्ट फ्लाईटने जाण्यासाठी सुमारे ६० प्रवाशांनी नोंदणी केली आहे. केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत या मार्गावर इंडिगो कंपनीकडून दि. १२ मेपासून विमानसेवा सुरू होणार आहे.कोल्हापूर-तिरूपती आणि कोल्हापूर-हैदराबाद या मार्गांवर ‘इंडिगो’द्वारे विमानसेवा सुरूकेली जाणार आहे. या मार्गावरील फर्स्ट फ्लाईटने जाण्यासाठी विविध क्षेत्रांतील नागरिक, प्रवासी, आदी उत्सुक आहेत. तिकीट नोंदणीला चांगला प्रतिसाद लाभत आहे. कोल्हापुरातून विमानाने उड्डाण करण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत, याचा आनंद आहे.
कोल्हापूरही आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आम्ही आमचे जाळे मजबूत करीत आहोत. परवडणारी सेवा, ग्राहकांसाठी पॉइंट-टू-पॉइंट कनेक्टिव्हिटी देऊ शकू, अशी माहिती ‘इंडिगो’चे मुख्य कमर्शिअल अधिकारी विल्यम बोल्टर यांनी दिली.
‘आरसीएस’मधील चौथा मार्गइंडिगोने सेवा देण्याचे ६९वे ठिकाण म्हणून कोल्हापूरचे नाव जाहीर केले आहे. आपल्या १३व्या एटीआर विमानाच्या साहाय्याने इंडिगो रोज कोल्हापूर ते हैदराबाद आणि कोल्हापूर ते तिरूपती या मार्गांवर विनाथांबा उड्डाणांची सेवा उपलब्ध करून देणार आहे. रिजनल कनेक्टिव्हिटी योजनेअंतर्गत (आरसीएस) अलाहाबाद, हुबळी आणि जोरहाट यांना जोडल्यानंतर इंडिगोच्या वतीने कोल्हापूर हा ‘आरसीएस’मधील चौथा मार्ग आहे, अशी माहिती बोल्टर यांनी दिली.
भाविकांचे मोठे प्रमाणकोल्हापूरहून मोठ्या प्रमाणावर भाविक तिरूपतीला जातात. तिरूपतीचे दर्शन घेतल्यानंतर कोल्हापूरच्या अंबाबाईला दर्शनाला येण्याची प्रथा आहे. त्यामुळे तिरूपती-कोल्हापूर या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.