शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
3
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
4
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
5
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
6
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
7
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
8
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
9
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
10
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
11
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
12
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
13
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
14
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
15
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
16
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
17
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
18
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
19
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
20
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट

कोल्हापूर उत्तरसाठी ईर्ष्येने ६० टक्के मतदान, शनिवारी फैसला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 11:37 AM

महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव विरुध्द भाजपचे सत्यजित कदम यांच्यात लक्षवेधी लढत झाली. या निवडणूकीचा फैसला शनिवारी (दि.१६) होणार आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीत मंगळवारी ईर्षेने आणि तणावपूर्ण वातावरणात सुमारे ६१ टक्के मतदान झाले. मतदानावेळी दोन्ही पक्षाचे नेते व कार्यकर्ते समोरासमोर आल्याने प्रचंड घोषणाबाजीच्या घटना घडल्या. त्यातून कांही ठिकाणी तणाव निर्माण झाला.महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव विरुध्द भाजपचे सत्यजित कदम यांच्यात ही लक्षवेधी लढत होत आहे. या निवडणूकीचा फैसला शनिवारी (दि.१६) होत आहे. या निकालाचा राज्याच्या सत्ताकारणांवर फारसा परिणाम होणार नसला तरी महाविकास आघाडीतील तीन पक्षांची एकजूट कितपत सांधली आहे याचा निकाल ही लढत देणार आहे.या निवडणुकीत रिंगणात पंधरा उमेदवार असले तरी लढत दुरंगीच झाली. प्रत्यक्ष उमेदवारांपेक्षा पालकमंत्री सतेज पाटील विरुध्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वर्चस्वाची लढाई असेही या लढतीला स्वरुप आले. एकूण २ लाख ९२ हजार मतदार होते. मतदानासाठी ३५७ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठ, मंगळवार पेठे,शुक्रवार पेठ अशा पेठांपासून ते राजारामपुरी-ताराबाई पार्कचा उच्चभ्रू वसाहती, शाहुपुरी-लक्ष्मीपुरीची व्यापारी वस्ती व गोरगरिब कष्टकरी झोपडपट्टीधारक असे संमिश्र मतदार असलेला हा मतदार संघ आहे. उन्हाचा तडाखा असूनही लोक मतदानासाठी बाहेर पडले.काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबरमध्ये निधन झाल्याने ही निवडणूक लागली. सुरुवातीच्या टप्प्यात ती बिनविरोध करण्याचे प्रयत्न झाले परंतू आगामी महापालिका निवडणूक व महाविकास आघाडीच्या कारभाराविरुध्दचा जनमताचा कौल अजमावण्यासाठी भाजपने मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला गेल्याने शिवसेना सुरुवातीला नाराज झाली. त्यामुळे भाजपने शिवसेनेच्या मतांवरच शेवटपर्यंत डोळा ठेवून निवडणूक लढवली.

आणखी काय हवं...भाजपने राज्यभरातून नेते, कार्यकर्ते प्रचारात उतरवले. शिवसेनेचेही मुंबई-पुण्याचे नगरसेवक प्रचारात होते. दोन्ही बाजूंकडून पैशांचे वाटप, जेवणावळीपासून किराणा दुकानांतून घरपोहोच माल पुरवण्यापर्यंत सर्व प्रकारची यंत्रणा राबवली.

एवढी चुरस कशामुळे..

ज्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदारांनी पेटीएमद्वारे एक हजार स्वीकारल्यास ईडीची धमकी मतदारांना दाखवली, त्यांच्याच पक्षाचे सहा प्रमुख कार्यकर्ते मतदारांना पैसे देताना आदल्या दिवशी पोलिसांनी पकडले. कांहीही झाले तरी ही लढत जिंकायचीच या ईर्षेनेच ही लढत झाल्याने या एका मतदार संघाच्या पोटनिवडणुकीकडे राज्याचे लक्ष वेधले.

हिंदुत्वाचा पुकारा...भाजपने ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. भगव्या टोप्या घालून मतदान केंद्रापर्यंत जयश्रीराम..च्या घोषणा दिल्या. त्याला शिव-शाहूंच्या विचारधारेच्या कोल्हापूरकरांनी मतपेटीतून काय उत्तर दिले यावरच याचा निकाल ठरणार आहे. भाजपची आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीची राजकीय दिशा काय असेल याचीच चुणुक या लढतीने दाखवली आहे.

वेळ व झालेले मतदान आकडेवारी

वेळ : टक्केवारी सकाळी ७ ते ९ : ६. ९६ टक्केसकाळी ९ ते ११ : २०. ५७ टक्केसकाळी ११ ते दुपारी १ : ३४.१८ टक्केदुपारी १ ते ३ : ५५.२६ टक्केसायंकाळी ६ वाजेपर्यंत : ६०.०९ टक्के (अंदाजे)

टॅग्स :kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkolhapurकोल्हापूरElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभाBJPभाजपाcongressकाँग्रेस