कोल्हापूर : करवीर निवासिनी श्रीअंबाबाईच्या दानपेटीत गेल्या दोन दिवसांत ६१ लाख ३८ हजार ७६२ रुपयांची भर पडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मंदिरातील दानपेट्यांची मोजदाद सुरू असून, आज बुधवारपर्यंत हे काम चालेल.अंबाबाई मंदिरातील दानपेट्या भरल्यानंतर ४५ ते ४५ दिवसांनी देवस्थान समितीकडून त्यातील रक्कम मोजली जात होती. मात्र, एकाच वेळी सगळ्या पेट्या भरल्याने रक्कम मोजायला ८ दिवस लागायचे. देवस्थान समितीचे सगळे कर्मचारी दिवसभर बसून पैसे मोजायचे. कंटाळून जायचे. शिवाय, सगळे कर्मचारी यातच अडकून राहायचे. त्यामुळे आता २० ते २५ दिवसांनी दानपेट्या उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारपासून पेट्यांमधील रकमेची मोजदाद सुरू असून, गेल्या दाेन दिवसांत ६१ लाख ३८ हजार ७६२ रुपयांची भर मंदिराच्या उत्पन्नात पडली आहे. आज बुधवारपर्यंत ही मोजणी चालणार आहे.
Kolhapur: अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांची मोजदाद, खजिन्यात पडली 'इतकी' भर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 2:51 PM