चंदगड :
चंदगड तालुक्यात हेल्थ वर्कर, फ्रंट लाइन वर्कर, ४५ ते ५९ वयोगटातील नागरिक, ६० वर्षांवरील नागरिकांना ३५,०९७ नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात आले. ४५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकसंख्या ६९ हजार असून त्यापैकी ३५०९७ नागरिकांना कोरोना लस देण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी दिली.
तालुक्यात ग्रामीण रुग्णालयासह, माणगाव, तुडये, कोवाड, हेरे, कानूर व अडकूर या प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण मोहीम सुरू आहे. याशिवाय अन्य ५ आरोग्य उपकेंद्रातूनही लसीकरण मोहीम चालू आहे. नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. तालुक्याच्या एकूण लोकसंख्येच्या पात्र यादीनुसार ४५ वयापेक्षा अधिक असलेल्या लाभार्थ्यांची संख्या ६९००० असून आतापर्यंत ३५०९७ नागरिकांना लस देण्यात आली आहे.
लसीबाबत नागरिकांत जागृती वाढलेली असून उत्स्फूर्तपणे नागरिक लसीकरण केंद्रावर येत आहेत.
---
कानूर येथे कोरोना केअर सेंटर
तालुक्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आज जरी कमी असली तरी संभाव्य धोका ओळखून कानूर प्राथमिक आरोग्य केंद्रातच ‘कोरोना केअर सेंटर’ सुरू करण्याची तयारी पूर्ण झाल्याचेही तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी सांगितले.