शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

इचलकरंजीत ६५ पॉझिटिव्ह ; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 4:19 AM

इचलकरंजी : शहरात विविध २९ ठिकाणी ६५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच, भारतमाता हौसिंग सोसायटी येथील ५३ वर्षीय ...

इचलकरंजी : शहरात विविध २९ ठिकाणी ६५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तसेच, भारतमाता हौसिंग सोसायटी येथील ५३ वर्षीय पुरुष व केटकाळे गल्ली येथील ६० वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये पाटीलमळा ८, गणेशनगर ७, सांगली नाका व जवाहरनगर प्रत्येकी ५, विक्रमनगर व इंदिरा हौसिंग सोसायटी प्रत्येकी ३, थोरात चौक, सहकारनगर, आसरानगर, राधाकृष्ण चौक, वखारभाग, संत मळा, अलायन्स हॉस्पिटलजवळ, भोनेमाळ, कृष्णानगर येथील प्रत्येकी २, भोनेमाळ, जुना चंदूर रोड, कागवाडे मळा, धान्य ओळ, खंजिरे मळा, अडत पेठ, गांधी कॅम्प, मथुरानगर, वैरण बाजार, पुजारी मळा, श्रीहरी टॉकीजजवळ, प्रियदर्शनी कॉलनी, हनुमाननगर, साई-समर्थनगर, केटकाळेनगर व बालाजीनगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. शहरात आतापर्यंत सहा हजार ५४० जणांना लागण झाली असून,पाच हजार ७२० जण बरे झाले आहेत. ४८१ जण उपचार घेत असून, मृत्यूसंख्या ३२२ वर पोहचली आहे.

दरम्यान, शहरातील अन्य खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झालेले व त्याची नोंद न झालेले १७ मृत्यूची नोंद नगरपालिकेने गुरूवारी एकत्रित दाखल करून घेतली. त्यामुळे शहरातील मृत्यूची संख्या ३३९ झाली आहे.