नगरपालिका मालमत्ता व दुकान भाडे यातून येणारे उत्पन्न हेच सर्वाधिक उत्पन्नाचे आर्थिक स्त्रोत आहे. मागील वर्षी आर्थिक वर्ष संपतानाच कोराेनामुळे वसुलीचे टार्गेट पूर्ण झाले नाही. मालमत्ता कर वसुली घटल्यामुळे मागील वर्षीची ९५ लाख रुपयाची थकबाकी राहिली होती. तर यंदा सव्वाचार कोटी रुपये मालमत्ता कराचे उद्दिष्ट आहे. सहा पथकाद्वारे कर वसुलीचे नियोजन सुरु आहे. ज्या मिळकतधारकांची थकबाकी आहे त्यांना महिना दोन टक्के व्याज आकारण्यात येणार आहे. ३१ मार्चपर्यंत कर वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी शहरातील सुमारे ५०० मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सात दिवसाची मुदत दिली असून त्यानंतर कारवाईचा इशारा पथकाने दिला आहे. थकीत पाणी करापोटी देखील कारवाईची धडक मोहीम सुरु आहे. २ कोटी १६ लाख रुपये पाणीकर पालिकेला मिळतो. यामध्ये १ कोटी ४ लाख रुपये वसूल झाला असून उर्वरित कराच्या वसुलीसाठी कारवाईची मोहीम सुरु करण्यात आली आहे. ६५ इतके नळपाणी कनेक्शन तोडण्यात आल्यामुळे नागरिकांनी कर भरण्यासाठी पालिकेत गर्दी करत आहेत. मिळकतधारकांनी कर भरुन नगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
जयसिंगपुरात ६५ नळ कनेक्शन तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:42 AM