मलकापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १२ पंचायत समित्यांना १४ व्या वित्त आयोगातून २०१५ ते २०१६ या वर्षाकरिता ६६ कोटी ८३ लाख १४ हजार रुपयांचा निधी प्राप्त होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) एम. एस. घुले यांनी दिली. शाहूवाडी पंचायत समिती येथे १४ व्या वित्त आयोगाच्या सूचना व मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते.केंद्र शासनाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना गावातील विकासासाठी ग्रामपंचायतींच्या खात्यावर निधी वर्ग केला आहे. ग्रामपंचायतींच्या खात्यावर सरळ निधी शासनाने प्रथम वर्ग केला आहे. हा निधी कसा खर्च करावयाचा याबाबत जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये अधिकाऱ्यांच्या कार्यशाळा सुरू आहेत. गावाला मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाच्या वार्षिक दीडपट, पंचवार्षिक दुप्पट या प्रमाणे आराखडा तयार करण्याचे काम गावागावांतील ग्रामपंचायतींमध्ये सुरू आहे. केंद ्रशासनाच्या आदेशाप्रमाणे प्राधान्याने गावातील स्वच्छतेसाठी निधी खर्च करावयाचा आहे. हा निधी पारदर्शकपणे खर्च होण्यासाठी केंद्र शासनाने प्रत्येक पंचायत समिती व ग्रामपंचायतींना लेखी आराखडा सादर केला आहे. यातील सूचनांप्रमाणे निधी खर्च करावयाचा आहे. शाहूवाडी तालुक्यातील १०६ ग्रामपंचायतींना केंद्र शासनाकडून ४७ कोटी २५ लाख ३९ हजार ३८ रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. (प्रतिनिधी)पंचायत समित्यांना खालीलप्रमाणे निधी प्राप्तकागल : ५ कोटी ३० लाख ३५ हजार १९४ रुपये, पन्हाळा : ५ कोटी ८९ लाख ४६ हजार ८२ रुपये, चंदगड : ४ कोटी ७८ लाख ६९ हजार ११ रुपये, गगनबावडा : १ कोटी ५२ लाख ८९ हजार ५५ रुपये, करवीर : १० कोटी ८० लाख ४७ हजार १४८ रुपये, आजरा : ३ कोटी १४ लाख ४१ हजार १० रुपये, भुदरगड : ३ कोटी ७५ लाख ६७ हजार १८२ रुपये, शिरोळ : ७ कोटी १४ लाख ८४ हजार ६८० रुपये, हातकणंगले : १० कोटी ८७ लाख ६३ हजार ११६ रुपये, गडहिंग्लज : ४ कोटी ५९ लाख ७० हजार ८१७ रुपये, राधानगरी : ४ कोटी ८७ लाख ३ हजार ७६७ रुपये, शाहूवाडी : ४ कोटी ७२ लाख ५३ हजार ९३८ रुपये.
कोल्हापूर जिल्ह्यात १४ व्या वित्त आयोगातून ६६ कोटी
By admin | Published: June 28, 2016 11:44 PM