शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

ऊस क्षेत्रात ६७ हजार हेक्टरनी घट

By admin | Published: August 04, 2015 12:32 AM

आयुक्तालयाचा अंदाज : राज्यातील परिस्थिती : कोल्हापूर विभागात मात्र ८,४२६ हेक्टरची वाढ

प्रकाश पाटील ल्ल कोपार्डे  राज्यातील साखर कारखान्यांच्या येत्या २०१५-१६ च्या गळीत हंगामासाठी नऊ लाख ८६ हजार ३५३ हेक्टर एवढे क्षेत्र गाळपासाठी निश्चित करण्यात आले आहे. त्यातून सुमारे आठ कोटी ८७ लाख ७२ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज साखर आयुक्तालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात उसाच्या क्षेत्रात ६७ हजार ४५७ हेक्टरने घट झाली असली, तरी कोल्हापूर विभागात आठ हजार ४२६ हेक्टरनी वाढ झाली आहे.यंदा साखर कारखान्यांच्या गळीत हंगामासाठी कोल्हापूर विभागातून दोन लाख ३० हजार ६०२ हेक्टर क्षेत्रातून दोन कोटी २५ लाख ८५ हजार मेट्रिक टन ऊस उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. विभागात यंदा उसाच्या क्षेत्रात मागील वर्षी तुलनेत आठ हजार ४२६ हेक्टरनी वाढ झाली आहे. पुणे विभागात तीन लाख ६७ हजार ८१ हेक्टर क्षेत्रामधून तीन कोटी ४६ लाख ९३ मेट्रिक टन ऊस उपलब्ध होण्याचा अंदाज आहे, परंतु या विभागात गेल्या वर्षीच्या तुलनेत उसाच्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक म्हणजे ३६ हजार २६२ हेक्टरने घट झाली आहे. नगर विभागातून एक लाख ३१ हजार ३७३ हेक्टर क्षेत्रातून एक कोटी ९ लाख ९५ हजार, औरंगाबाद विभागातून एक लाख ३ हजार ६३२ हेक्टरमधून ७४ लाख २८ हजार मेट्रिक टन, नांदेड विभागातून एक लाख २६ हजार ६२९ हेक्टर क्षेत्रातून ८८ लाख १७ हजार मेट्रिक टन, अमरावती विभागातून तीन हजार ७९ हेक्टर क्षेत्रातून दोन लाख ३ हजार मेट्रिक टन, तर नागपूर विभागातून १२ हजार ९२७ हेक्टर क्षेत्रातून सात लाख ५८ हजार मेट्रिक टन ऊस उपलब्ध होण्याचा अंदाज आहे.जिल्हानिहाय उसाचे क्षेत्र (हेक्टरमध्ये) कंसात गाळपासाठी उपलब्ध होणारा ऊस (लाख टनांत) : कोल्हापूर - १,४५,२८६ (१३६.५७), सांगली - ८३,९६६ (२२५.८५), सातारा - ६५,५०४ (६४.८५), पुणे - १,१८,४३० (११७.२५), सोलापूर - १,८३,१४७ (१६४.८३), नगर - १,१२,४१५ (९६.६८), नाशिक - १८,९५८ (१३.२७), धुळे - २,०६० (१.४४), नंदुरबार - १४,१२३ (११.१६), जळगाव - ९,९७४ (६.८८), औरंगाबाद - १५,३०६ (११.९४), जालना - २६,०९६ (१९.०५), बीड - ३६,०७३ (२३.८१),परभणी - २८,४८१ (२०.२२), हिंगोली - १५,१९१ (१०.१८), नांदेड - १८,७९२ (१२.५९), उस्मानाबाद - ४१,४७८ (२८.६२), लातूर - ४१,४७८ (२८.६२), बुलडाणा - ३४२ (०.१५), अकोला - १००, वाशिम - २०९ (०.११), अमरावती - ३२१ (०.२०), यवतमाळ - १३,५७९ (८.९६), वर्धा - ३०७९ (२.०३), नागपूर - ४,३६२ (२.४०), भंडारा - ४,३६१ (२.४४), गोंदिया - ९५५ (०.६०), चंद्रपूर १०२ (०.०६), गडचिरोली - ६८ (०.०४), सिंधुदुर्ग - १,३५० (१.१२).