कोरोनामुळे अतिगंभीर अवस्थेत डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या गडहिंग्लज तालुक्यातील ६८ वर्षीय महिलेला तबल महिनाभराच्या यशस्वी उपचारानंतर नवजीवन मिळाले आहे. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या कोविड विभागातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे बुधवारी ही महिला कोरोनामुक्त होऊन घरी परतली.
गडहिंग्लज तालुक्यातील कडेगाव येथील ही ६८ वर्षीय महिला २६ एप्रिल रोजी श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास व सतत येणारा ताप या कारणांनी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्याने तिला आयसीयूमध्ये उपचारार्थ दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी तिच्यावर यशस्वी उपचार केल्याने ही महिला यशस्विरित्या यातून बाहेर पडली. तिने डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे कोरोना विभागप्रमुख डॉ. राजेश ख्यालाप्पा यांच्यासह टीमचे आभार मानले.