शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कोल्हापूर जिल्ह्यात पाच वर्षांत ६८२ बालमृत्यू -: परंपरा, अज्ञानाचा पगडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 1:05 AM

जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत शून्य ते पाच वर्षे वयोगटांतील ६८२ बालमृत्यू झाले आहेत. त्यांतील ९० टक्के बालमृत्यू हे बालकांचे संगोपन, आरोग्यासंबंधीच्या रूढी-परंपरा, गैरसमज आणि अज्ञानामुळे झाले

ठळक मुद्देइतर राज्यांच्या तुलनेत प्रमाण कमी मात्र प्रबोधन करणे गरजेचे

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत शून्य ते पाच वर्षे वयोगटांतील ६८२ बालमृत्यू झाले आहेत. त्यांतील ९० टक्के बालमृत्यू हे बालकांचे संगोपन, आरोग्यासंबंधीच्या रूढी-परंपरा, गैरसमज आणि अज्ञानामुळे झाले आहेत. उर्वरित १० टक्के बालकांमध्ये जन्मत:च दोष आढळून आले आहेत.

अर्भक मृत्यूदर कमी करण्यासाठी शासनपातळीवर वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत. विदर्भ, मराठवाड्यात अनेक बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू होतो. मात्र सधन-समृद्ध कोल्हापुरात बालसंगोपनाविषयी चालत आलेल्या रूढी-परंपरा, अंधश्रद्धा, बालकांच्या आरोग्याविषयी असलेल्या अज्ञानामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण जास्त आहे. देशातील राज्यांचा विचार करता उत्तरप्रदेश, राजस्थान, बिहार या राज्यांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. महाराष्ट्राचा बालमृत्यू दर १९ टक्के, तर कोल्हापूरचा ११ टक्क्यांवर आहे.

बालमृत्यूदर गेल्या सात-आठ वर्षांच्या तुलनेत कमी असला तरी त्याच्या सामाजिक कारणांबाबत फारशी चर्चा होत नाही. बाळ जन्मल्यानंतर त्याची वाढ आईचे दूध आणि स्पर्शातून मिळणारी ऊब यांमुळे होते. मात्र, अनेकदा बाळ दूध पीत नाही, आजारी आहे, या कारणांमुळे गाई-म्हशीचे, शेळीचे दूध त्याला दिले जाते. पाळणा, झोळी व तत्सम गोष्टींमुळे बाळ स्तनपानाव्यतिरिक्त मातेजवळ फारसे नसल्याने त्याला आईची ऊब मिळत नाही. बाळ आजारी पडले की घरगुती उपायांवर भर दिला जातो. सोबत गंडे-दोरे, भोंदूबाबा, कुणीतरी सुचविलेले अघोरी उपाय केले जातात. बाळाची प्रकृती खूप खालावली की मग दवाखान्याचा विचार केला जातो.

अनेकदा कौटुंबिक, आर्थिक अडचणी, गांभीर्याचा अभाव, कुटुंबातील वयस्कर व्यक्तींच्या विचारांचा पगडा, निर्णयाला विलंब, स्थानिक पातळीवर तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, वेळेत व योग्य उपचार न मिळणे, १०८ अ‍ॅम्ब्युलन्स वेळेत न मिळणे, नर्स अथवा आरोग्य कर्मचाऱ्यांना उपचारांची माहिती नसणे या त्रुटीही बालमृत्यूला जबाबदार ठरतात.निदान : करण्यात येतात अडथळेअनेकदा स्वस्थ आणि हसत-खेळत असलेले बाळ अचानक किरकोळ कारणाने दगावते. रात्री निवांत झोपेच्या कुशीत गेलेले बाळ सकाळी निपचित असते. अशावेळी तात्पुरत्या स्वरूपात समोर दिसतील किंवा वाटतील ती कारणे सांगितली जातात; पण बाळ नेमके कशामुळे दगावले हे कळण्यासाठी त्याचे शवविच्छेदन होणे गरजेचे असते. मात्र, बाळासोबत प्रत्येकाचीच नाळ इतकी जोडलली असले की शवविच्छेदन होत नाही; त्यामुळे बाळ दगावण्यामागची नेमकी कारणमीमांसा करता येत नाही.प्रतिबंध, जागृती हाच उपाय : जन्मत: अर्भकामध्ये दोष असेल तर बालमृत्यू टाळणे अवघड असते. मात्र हे प्रमाण नगण्य असते. उलट चुकीच्या पद्धतीने होणारे संगोपन आणि गैरसमज हे महत्त्वाचे कारण आहे. यात ‘आशा’ व अंगणवाडी सेविकांची महत्त्वाची भूमिका आहे.माता व बालकांसाठी राबविलेल्या योजनाजननी सुरक्षा योजनाजननी शिशू सुरक्षाप्रधानमंत्री मातृवंदना योजनामातृत्व अभियानग्रामभारत विकास केंद्रकोल्हापुरातील बालमृत्यूदर गेल्या दोन वर्षांत काहीअंशी कमी झाला असला तरी तो समाधानकारक आहे, असे म्हणता येणार नाही. तो कमी करण्यासाठी आम्ही कुटुंबातील वयस्कर व्यक्ती व मातेच्या प्रबोधनावर भर दिला आहे. कोल्हापुरातील बालमृत्युदर११ टक्क्यांवरून केरळप्रमाणे १० टक्क्यांच्या आत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.- डॉ. योगेश साळे (जिल्हा आरोग्याधिकारी)

टॅग्स :Medicalवैद्यकीयkolhapurकोल्हापूर